Friday, August 10, 2012

पाकिस्ताननामा - २





सफर  पाकिस्तानचा
                 


(कराची-इस्लामाबाद-रावळपिंडी-एबोटाबाद)

लाहोर नंतर आपला मुक्काम आहे कराची ला ! खरे तर इथल्या वातावरणात आणि मुंबईच्या वातावरणात काहीच म्हणजे काहीच फरक नाही आहे! पाकिस्तानची ही राजधानी पण होती.. परंतु नंतर ती रावळपिंडी व शेवटी इस्लामाबाद ला ( काश्मीर पासून जवळ असल्याने?) कायमस्वरूपी स्थलांतरित केली. आपण तेथे सुद्धा जाऊ ( आणि जमल्यास तेथून काहीच अंतरावर असलेल्या "एबोटाबाद" मध्ये पण ! )

                               


खरे तर कराचीला ऐतहासिक दृष्ट्या असे फारसे काही आढळे नाही आपल्याला.. तरीसुद्धा १ मजेची गोष्ट म्हणजे कराची शहर हे ( फाळणीपूर्वी) मुंबई च्या अधिकाराखला होते.. म्हणजेच येथील सगळे कामे मुंबईतून चालायची ! आणि १ आश्चर्याची गोष्ट म्हणजे कराचीचा कारभार हा तेव्हा पंजाबी - उर्दू - हिंदीतून नाही तर चक्क आपल्या शिवरायांच्या "मोडी" लिपी तून चालायचा ! तेथील सरकारी दफ्तरात अजूनसुद्धा अशी कितीतरी जुनी कागदपत्रे पडली असतील "मोडी" लिपी मध्ये !


तेथील जुन्या इमारती ( ब्रिटीशकालीन वैभव जपणाऱ्या ) अजूनही आहेत तश्याच आहेत ! आता आपण तेथे फिरलो तर आपल्याला पाकिस्तान मधील काही श्रीमंत लोकांच्या कोठी दिसून येतील ! रस्त्यावरून चालत चालत आपल्याला आता रस्त्याचं दुतर्फा दोन्ही बाजूस श्रीमंत लोकांचे बंगले तसेच " पॉश " इमारती सुद्धा दिसून येतील!

कराची हे पाकिस्तानची आर्थिक राजधानी आहे ( आपल्या मुंबई सारखी ) येथून होणारा व्यापार ( आणि दहशदवाद सुद्धा! ) पाकिस्तान साठी खूप महत्वाचा आहे. खरे पाहता पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आलेली आहे. अमेरिकेच्या ताकदीने ती सध्या पूर्णपणे उभी आहे तसेच सौदी अरेबिया येथील काही श्रीमंत लोकांच्या "दान धर्मा"मुळे. कराची चे बंदर हे व्यापार साठी खूप प्रसिद्ध आहे! तेथील अर्थव्यवस्थेचा काना असलेले हे शहर आहे! 

खरे पाहता कराची मधला सर्वात श्रीमंत लोकांचा कोणता रस्ता असेल तर तो तो "क्लिफ्टन एरिया".. तेथे राहणारे बहुतेक लोक हे "गर्भ श्रीमंत आहेत". खरे पाहता कराची मध्ये ऐतिहासिक दृष्ट्या काहीच पाहण्या सारखे नाही आहे पण कराची पाहिल्याशिवाय राहवत पण नाही म्हणूनच आपण ते पहिली ! लेखाच्या सुरवातीला मी मुद्दामूनच कराची चा उल्लेख हा मुंबई सारखाच केला होता कारण येथील वातावरण  हे मुंबई सारखेच आहे ( किंबहुना समुद्राजवळ असल्या कारणाने ). आपण लाहोर वरून विमान त्तालाने किवा बस ने कराची पर्यंत चा प्रवास करू शकता ! येथे रेल्वेने प्रवास केलेला चालत नाही . म्हणजे येथे रेल्वे ला थांबवून तेथील लोकांना लुटायची अतिशय जुनी सवय आहे म्हणून बस ने किवा विमानाने प्रवास केलेला कधीही चांगला!  आता आपण कराचीची अगदी धावत पळत भेट घेतली आहे तिथून आपल्याला जायचे आहे आता इस्लामाबाद ला! आपण आता पी. आय.ए. च्या विमानात बसून कराची ते इस्लामाबाद हे अंतर कापुयात!  
                                                                                     
                              


मुक्काम पोस्ट इस्लामाबाद 

पाकिस्तानच्या राजधानीत आपण आता आलो आहोत ! पाकिस्तान च्या राजकारणात हा पंजाबी लोकांचा प्रभाव तर नेहमीच जाणवतो. म्हणूनच किती प्रयत्न करून "इस्लामी" राष्ट्र तयार करून राष्ट्रीय भाषा म्हणून जरी "उर्दू" असली तरीसुद्धा पाकिस्तानात त्या त्या प्रांतात त्या त्या  प्रदेशातील स्थानिक भाषाच बोलली जाते. जसे कराची नजीक च्या प्रदेशात हे गुजराथी-मारवाडी सदृश भाषा बोलली जाते ( तेथून भारताची सीमा जवळ आहे ) . आता इस्लामाबाद मध्ये आपण येऊन पोहोचलो. सगळ्यात चंगली गोष्ट म्हणजे इस्लामाबाद मध्ये तुम्हाला हॉटेल ची कमतरता जाणवणार नाही. येथील बस स्टोप च्या जवळच अशी बरीच हॉटेल्स आहे जिथे आपण मुक्काम करू शकतो! आता आपण पाकिस्तानचं दारार्या खालच्या भागात आलो आहोत. पण तरी सुद्धा आपण येथे फिरताना आपल्याला १ गोष्ट जाणवते कि येथे  लष्कराच्या सामर्थ्य हे निवडून दिलेल्या सरकार पेक्षा जास्त आहे !
                       

इस्लामाबाद हे शहर आधीपासून मात्र मुळीच नव्हते. या शहराची मुद्दामून निर्मिती करण्यात आली आहे.फ्रेंच वास्तुकार ली कार्बूजियर याने या नगराची स्थापना करण्यास मोलाची भूमिका बजावली आहे! विशेष म्हणजे याच महोदयांनी भारतातील चंडीगड या शहराच्या निर्मितीत सुद्धा मोलाचा वाटा उचललेला म्हणूनच आपल्याला इस्लामाबाद व चंडीगड या २ शहरात साम्य दिसून आले तर काही नवल नाही ! २००९ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या  ६,७३,७६६ एवढी आहे ! शहरात प्रवेश केल्यापासून आपण पाकिस्तानची "संसद" पाहू शकतो जेथून जवळच प्रधानमंत्री निवास आहे! विशेषतः येथे उद्यानांची संख्या जास्त आहे येथील "फातिमा जिना " उद्यान सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे ! इस्लामाबाद ची ओळख म्हणून एका ठिकाणाला विसरून चालणार नाही ते म्हणजे "फैज़ल मस्जिद" ! अश्या प्रकारे आपण हा प्रदेश सुद्धा पाहिलात.. घाईघाईत का होईना पण आता आपण रावळपिंडीत सुद्धा १ चक्कर मारून येऊ! हे शहर साफ मात्र नाही आहे ! तेथे भारतीय चित्रपट सृष्टीतील कलाकारांबद्दल प्रचंड आकर्षण आहे ! तेथील बाजारात भारतात प्रदर्शित झालेल्या किवा प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या अनेक चित्रपटांचं संगीत  मिळते.. येथे आपल्या चित्रपटांच्या "पायरसी" चे प्रमाण मात्र जास्त आहे! येथे मुख्य प्रवास आपल्याला "बस" मधूनच करावयाचा आहे! पाकिस्तानात बस म्हणजेच सर्वात स्वस्त आणि मस्त असा वाहतुकीचा उपलब्ध मार्ग आहे ! येथे पाकिस्तानची राजधानी असूनसुद्धा येथील बहुतेक भाग हा ग्रामीण आहे! आता माझी नजर वळली आहे येथून काही अंतरावरच दूर असलेल्या " एबोटाबाद" या शहर कडे !




इस्लामाबाद ते "एबोटाबाद"
                           


खरे तर हे शहर "जगभरात" चर्चेत आले जेव्हा आंतरराष्ट्रीय आतंकवादी ओसामा बिन लादेन हा येथील एका प्रचंड आवाराच्या बंगल्यात अमेरिकेच्या "नेव्ही सील कमांडो " नी केलेल्या कारवाईत ठार झाला! तेव्हा पासून हे शहर ( विशेषतः गुगल अर्थ वर ) अतिशय चर्चेत आले होते ! खरे तर हे शहर १ थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे ( परंतु पाकिस्तानची बर्यापैकी मोठी असणारी लष्करी छावणी देखील याच ठिकाणी आहे ) विशेषतः पाकिस्तानचे लष्कर याच भागात असते , येथे अनेक निवृत्त अधिकाऱ्यांचे बंडले देखील आहे.एबोटाबाद या शहरात जानेवारीच्य सुमारास हिमवृष्टी होते . तसेच येथील सर्वात उंच जागेचे नाव भारतातील एका शहराचे आहे ते म्हणजे " सिमला टेकडी" . येथून आपल्याला सर्व एबोटाबाद दिसत आहे उंच वरून !  "एबोटाबाद"या शहराची स्थापना ब्रिटीश अधिकारी मेजर जेम्स एबट याने जानेवारी १८५३ साली केली! तसेच त्याने तेथे ब्रिटीश सैन्याची छावणी उभारली , सध्या तिथे पाकिस्तानची स्वतःचं सैन्याची छावणी आहे. येथून काही अंतरावरच आहे ओसामा बिन लादेन ची ती हवेली, जिथे तो १ मे २०११ ला चकमकीत ठार झाला! छायाचित्रात दाखवलेल्या हवेलीत ओसमा बिन लादेन याला ठार मारण्यात आलेले.  इतकी उंच हवेली या भागात आणखीन कोणाचीच नव्हती, तसेच येथून कचरा कधी घराबाहेर टाकला जायचा नाही तो जाळला जायचा तसेच इतक्या मोठा हवेलीत तेलीफोने किवा इंटरनेट कनेक्शन नव्हते , म्हणूनच अमेरिकेच्या एजंट न या हवेली वर शक झाला! व पुढचा इतिहास आपल्याला माहितच आहे!
                             
   
निरोप !

आपण खरेच आज पाकिस्तान मधून खूप काही बघितले आहे! आता माझ्याबरोबर आपणही नक्कीच थकलेले असणार! आता सध्या आराम करून आपण उद्या पाकिस्तान मधल्या शेवटच्या दिवसाची तयारी करूया! कारण उद्या आपण ज्या जागेवर जाणार आहोत ते जागा आता आपण पाहिलेल्या शहरांसारखी मुळीच नाही ! अनेक धोके , क्षणा क्षणाला मृत्यू ची जाणीव तसेच जीव हातात घेऊन आता उद्या आपण प्रवासाला निघणार आहोत! ही जागा म्हणजे इस्लामाबाद पासून १५० किमी अंतरावर असलेले १ शहर , वायव्य सरहद्द प्रांतातले प्रमुख शहर " पेशावर " !



No comments: