Saturday, August 11, 2012

पाकिस्ताननामा - ३ (अंतिम भाग)



सफर पाकिस्तानचा !



आज आपल्या प्रवासाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे !! आणि माझ्या मते हा सर्वात कठीण आणि अवघड असा प्रवास आहे! काल आपण एबोटाबाद वरून इस्लामाबाद येथे मुक्काम केला आहे आणि आज आपण इस्लामाबाद पासून १५० किमी अंतरावर असलेल्या पेशावरला जाऊ ! खरे तर माझ्या मनात "खासकरून" या प्रदेश बद्दल खूप म्हणजे खूप उत्सुकता आहे! आणि सर्वाधिक उत्सुकता आहे पेशावर ला पोचून सर्वात आधी ती "खैबरखिंड" पाहण्याची! कारण तिथूनच मुघल भारतात आलेले! पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांना जोडणारी एकमेव जागा म्हणजे हे खैबरखिंड! खरे पाहता भारतीयांना येथे जाण्यास मज्जाव केला जातो.. १ किस्सा जरूर येथे नमूद करावासा वाटतो, भारताचा क्रिकेट संघ हा पाकिस्तानच्या दौर्यावर गेलेला तेव्हा आपल्या वंडरबॉय सचिन तेंडूलकरने ही "खैबरखिंड" पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली परंतु सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी सरकारकडून या साठी मंजुरी मिळाली नाही! असो ! आपल्याला आज पहावयास मिळते का ते आधी पाहू !

                                 

या साठी आपण इस्लामाबाद येथील बस डेपो कडे आधी कूच करू आणि तेथून मग पेशावर कडे जायला प्रस्थान करू ! बस सुरु झाल्यावर आपण दोन्ही बाजूनी पहिले तर आपल्याला दिसून येईल की रस्ता हा चौपदरी आहे  मग दुपदरी आणि नंतर अतिशय खराब होत होत जातो ! परंतु येथे पोचावयास आपल्याजवळ आणखीन कोणतेच दुसरे साधन नाही ! त्यामुळे आपल्याला बस नेच पुढे पुढे जावे लागणार! खरे तर १५० किमी चा प्रवास खूप मोठा आहे. तोवर आपल्याला १ गोष्ट सांगतो म्हणजे रस्त्यातला प्रवास हा अतिशय सोपा होऊन जाईल! कसे आहे गप्पा मारत मारत प्रवासाची लांबी कमी होते असे म्हणतात !  पेशावर हे प्रसिद्ध आहे तेथील "पठाण" जमाती साठी आणि येथील सर्वात लोकप्रिय व्यक्ती जर कोणी असेल तर ते भारताचे ( व पाकिस्तानचे ) नेते "खान अब्दुल गफारखान" उर्फ "सरहद गांधी" !

                                       

"सरहद गांधी" ! 

होय बरोबर ऐकलेत आपण , खान अब्दुल गफारखान यांना "सरहद्द गांधी:" असेच म्हंटले जायचे! इंग्रज देखील त्यांना किंग खान ( शाहरुख खान च्या आधीचे, आणि पहिले  व अस्सल किंग खान!)  असे संबोधत असत ! त्यांचा जन्म १८९० साली पेशावरलाच  झाला ( नेमकी जन्मतारीख उपलब्ध नाही ) . खान अब्दुल गफार खान हे आधी स्वतंत्र  धर्मनिरपेक्ष भारताच्या  पक्षातले होते, त्यांनी वायव्य सरहद्ध प्रांतात ( म्हणजे पेशावर नजीक अफगाणिस्तान च्या परिसरात ) भारताला स्वातंत्र्य करण्याचे आंदोलन सुरु ठेवलेले परंतु शुद्ध "अहिंसक" मार्गाने . म्हणूनच यासाठी त्यांनी १९२० साली खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली! ही संघटना अहिंसक तत्वांवर चालणारी होती! गांधीजींचे ते पक्के दोस्त होते ! विशेषतः ते दिसायला पण गांधीजी सारखेच होते .. त्याला जर आपण लांबून पहिले तर ते गांधीजीच दिसत असत! त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय उदार होते, तसेच भारदस्त ही . त्यांची शरीर बळकट होते आणि उंची ६ फुटांहून अधिक म्हणजेच ते पठाण शोभत होते ! एकदा त्यांना सरकार ने अटक केली परंतु त्यांच्या हातात हातकडी घालण्यासाठी त्यांच्या हाताच्या  मापाच्या हातकड्याच नव्हत्या ब्रिटीश सरकारकडे! गोरेपान असलेले धडधाकट गफारखान यांचे हात त्या छोट्या हातकड्यांमुळे लालेलाल झाले त्यामुळे त्यांनी अटक झाल्यानंतरही तेथून हलले नाही! तेव्हा ब्रिटीश सरकारतर्फे त्यांच्या साठी खास "बग्गी" ची व्यवस्था करण्यात आली तेव्हा सन्माने त्यांना बग्गीतून तुरुंगात नेण्यात आले!विशेष म्हणजे पेशावर भागात ( वायव्य सरहद्द प्रांत ) येथे कोंग्रेस चे सरकार आले ते यांच्या मुळेच ! परंतु दुर्दैवाने फाळणी नंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी ( शहरात ) पेशावर येथे जावे लागले! तेथे गेल्यावर त्यांनी पाकिस्तान कडे आपल्या स्वतंत्र पठाणी अनुयायांसाठी स्वतंत्र पख्तुनिस्तानाची मागणी आजन्म केली! खरे पाहता ते भारत व पाकिस्ताना या दोन्ही देशांचे सुपुत्र होते!

नंतर ते १९७० साली भारतात आले व देशभर फिरले भारतातील लोकांनी त्यांना "थैली" अर्पण केली (पुरस्कार) ! तथापि त्यांनी भारत सरकारकडे पाकिस्तान सरकार हे त्यांना हीन  दर्जाची वागणूक देत असल्याची तक्रार केली! या दोन्ही देशाच्या महान सुपुत्राकडे  पाकिस्तानी सरकारने मात्र कायम कानाडोळाच केला, परंतु भारत सरकारने याची दाखल घेत त्यांना भारताचा "सर्वोच्च" नागरी सन्मान "भारतरत्न" प्रदान केला १९८७ साली ! ते  भारतरत्न पुरस्कार मिळालेले पहिले अभारतीय आहेत. खरेच अश्या महान नेत्याच्या हा गौरव यथायोग्य होता! पुढच्याच वर्षी त्यांना पाकिस्तान सरकारने त्यांच्या राहत्या घरात नजरबंद केले, व पुढे त्याच वर्षी २० जानेवारी १९८८ साली त्यांची प्राणज्योत मावळली! त्यांच्या इच्छे नुसार अफगाणिस्तान येथील जलालाबाद येथे त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. विशेष म्हणजे तेव्हाचे आपले पंतप्रधान "राजीव गांधी " हे देखील त्यांच्या अंतिम संस्कारास उपस्थित होते! "सरहद्द गांधी" यांची ही कहाणी खरेच मनाला चटका लाऊन जाते! अरे.. बोलता बोलता आपण पेशावर ला पोचलो सुद्धा! खरेच गप्पा मारता मारता प्रवास कसा संपतो ते समजत पण नाही!


                        

मुक्काम पोस्ट पेशावर!
                   

पेशावरला पोहोचताच माझ्या स्मृती जाग्या झाल्या की या प्रदेशावर आपल्या मराठ्यांचे सुद्धा १ वर्ष राज्य होते , ८ मे १७५८ ला ला झालेल्या लढाईत आपल्या मराठ्यांनी विजय मिळवला आणि पठाण आणि अफघाण लोकांच्या प्रदेशात मराठ्यांचा भगवा शानने फडकत होता ! येथे आपण बस डेपो च्या पुढे आलो की लागतात इमारती त्या तश्या जुन्याच आहेत खरे पाहता येथील प्रदेशाचा विकास झाला नाही आहे मुखत्वे या प्रदेशात शिक्षणाचा आभाव आहे , शिक्षणाला महत्व नसल्याने येथील लोक हे गरीब आहे (पण मनाने तितकेच मोठे देखील आहेत !) येथील लोकांच्या मनात भारतीय लोकांबद्दल सदैव कुतूहल सहानुभूती तसेच प्रेम ( "सरहद्द गांधींमुळे ?) आहे ! म्हणून पठाणी माणूस तसा मनाचा राजाच म्हणायला हवा! आता "सरहद्द गांधींची " आठवण काढली आहे तर त्यांच्या खाणाखुणा शोधायला आपण आधी निघू! परंतु दुर्दैवाने आता त्यांच्या खाणाखुणा फारश्या राहिल्या नाही आहेत पेशावर मध्ये  ( पाकिस्तान च्या प्रभावामुळे ?) , पण मला त्यांच्या नावाचा १ चौक मात्र दिसला आहे आणि सध्याच्या पेशावर मध्ये त्यांची स्मृती जपणारे बहुदा हेच स्मारक आहे. परंतु त्याच्यावर सरहद्द गांधी असे लिहिले नाही आहे तर फ्रंटीयर लीडर  (म्हणजे "सरहद्द नेते ") असे लिहिले आहे! तरीसुद्धा खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद्द गांधी या नावाचा दबदबा येथे मात्र आजही जाणवतो ! येथे आपल्या इतिहासाशी संबंधित वस्तू म्हणजे "महाबत"खानाचे थडगे. हा महाबतखान जहांगीर बादशाहच्या सैन्यात होता त्याने अंतिम श्वास येथे घेतला आता येथे १ मस्जिद पण आहे! थोड्याच अंतरावर पेशावारचे वास्तुसंग्रालय आहे

                              

त्यात पुरातन वस्तूंचा संग्रह पहावयास मिळतो! पेशावर मधील इमारतींवर मुघल तसेच पश्तू ( अफघाणी) वास्तुशैली चा प्रभाव आपल्याला दिसतो! येथे सुद्धा नवीन पेशावर व जुने पेशावर असे २ भाग आहेत. येथील नमक मंडी हा भाग प्रसिद्ध आहे तेथील बाजारपेठे साठी ! अफगाणिस्तान सरहद्द जवळ असल्याने तेथील बहुतेक माल हा येथील बाजारपेठेत उपलब्ध होते विशेषतः खजूर तसेच सुका मेवा मुबलक प्रमाणात येथे आढळतो. येथे शिक्षणाची फारशी काही "चांगली" सोय नाही आहे तरीसुद्धा इस्लामिया विद्यापीठ येथील युवक\युवतीं साठी गुरुकुल चे काम करत आहे! बाजारपेठेत फिरत असताना आपण पठाणी माणूस हा किती मस्तमौला आणि दिलदार असतो याची ख्याती तर ऐकली व आता पहिली आहे ! परंतु आता वेळ खरेच कमी आहे आपल्याला निघायचे आहे खैबरखिंड बघायला! हा भाग म्हणजे "खतरे पे खतरे" आहेत! कारण याच भागात आहेत अफगाणिस्तानी लोकांचे रेफ्युजी कॅम्प !
                               

खैबरखिंड !                                 

"भारतावर आक्रमण करायचे आहे" हा प्रश्न मुघल \पश्तू  बादशहांना पडायचा तेव्हा ते खैबरखिंडी मार्गे भारतात ( आताचा पाकिस्तान) यायचे! बाबर ने सर्वात आधी ही खिंड पार करून जेव्हा भारतात पाय ठेवले तेव्हा त्याने लगेच पहिले काम केले ते म्हणजे पेशावरला कायमचा "किल्ला" बांधला तो म्हणजे पेशावरचा किल्ला ( आपल्याकडे पहावयास तेव्हढा वेळ नाही आहे! क्षमस्व ) येथून पुढे काही अंतरावरच आहे खैबर खिंड! सध्या याच्या प्रवेशद्वाराचे नुतनीकरण करण्यात आले आहे! संपूर्ण नागमोडी असणारी ही खैबरखिंड पार केली की आपण एकतर पाकिस्तान किवा अफगाणिस्तान येथे येऊन पोहोचतो! पहिल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे हा सुद्धा "जी. टी. रोड" चा १ भाग आहे! आता मात्र येथे अफगाणिस्तान शरणार्थी कॅम्प आहे ! जिथे पहा तिथे मुजाहीर लोक आहेत! टोयोटा गाडी ला "जीप" बनवून आणि हातात अत्याधुनिक हत्यारे घेऊन रस्त्यावर फिरताना आपल्याला सहज सापडतात! येथे अश्या प्रकारचे आतंकवादी कॅम्प तर सर्रास पहावयास मिळतात! जर आपल्याला कोणी थांबवून आपली चौकशी केली तर झाले काम तमाम! कारण या भागात पाकिस्तान सरकारचे पण काही "फारसे" चालत नाही ! येथील "धर्मप्रेमी" लोक आपल्या आपल्या कायद्यानुसार येथील कारभार चालवतात! म्हणून शक्य ते डोळ्यात भरून आपण खैबरखिंड पाहून निघुयात! तरी जाता जाता त्या भागाचे सौंदर्य आपले लक्ष वेधते! काय म्हणत असेल ही खैबरखिंड ? हिंदुस्थानात जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाले तेव्हा तेव्हा ची साक्षीदार असलेली ही खैबरखिंड आता आपल्या नजरेपासून हळू हळू लांब लांब होत चाललेली! खरेच आपल्या सारख्या भारतीयांना खैबरखिंड पाहणे खूप म्हणजे खूप दुर्मिळ आहे! कारण हा भाग तसा फारसा सुरक्षित नाही आहे! संध्याकाळ व्हायच्या आत आता आपल्याला पेशावर बस स्टोप ला पोहोचणे गरजेचे आहे! आपली संध्याकाळची "इस्लामाबाद" साठीची बस आहे! तेथून आपण इस्लामाबाद विमानतळावरून मुंबई साठी निघणार आहोत!
                           

शेवट ? नव्हे सुरवात !

आता आपण बस मध्ये बसून माझ्या सारखाच हा विचार करत आसल की हे ३ दिवस किती मस्त गेले, घाईघाईत का होईना पण आपण अर्ध्याहून अधिक पाकिस्तान बघितला! आणि सर्वात जास्त म्हणजे आपले आभर की आपणही मला माझ्या या "भटकंतीत" साथ दिलीत!  तुमच्या आमच्या सारख्या भटक्या लोकांना प्रवास म्हंटले की अंगात एक वेगळीच शक्ती संचारते! म्हणून "पाकिस्तान" का होईना आपण १ देश फिरलो याचे समाधान माझ्या व तुमच्या चेहऱ्यावर आहे! उद्या सकाळपर्यंत आपण मुंबईत पोचू सुद्धा ! कसा वाटला हा एका शेजारील देशाचा प्रवास ते कळवायला विसरू नका !  पुन्हा भेटूयात एका नव्या देशाच्या \प्रदेशाच्या भटकंतीत !
.

.
जाता जाता आपल्या मागील २ दिवसांच्या आठवणी !
पाकिस्ताननामा-१  - लाहोर (दिवस पहिला)

पाकिस्ताननामा २ - कराची -इस्लामाबाद-रावळपिंडी-एबोटाबाद (दिवस दुसरा)




No comments: