पाकिस्तान या विषयावर आपल्या कडे बोलण्या सारखे खूप काही आहे ! खरेतर पाकिस्तानचे नाव काढले कि आपल्या डोळ्या समोर येतो तो २६/११ चा आतंकवाद्यांचा आपल्या "भारत" देशावरचा हमला ! पण पाकिस्तानची अजून एक ओळख आहे, तेथील जागा , भौगोलिक वैशिष्ट्य , तेथील ऐतिहासिक अवशेष ( आपल्या भारताच्या संदर्भातले ) यांच्या बद्दल काळात नकळत का होईना आपल्या कानांवर पडतेच ! जसे आपल्याला शाळेच्या इतिहासात "हडप्पा" आणि "मोहेन्जोडो" येथील संस्कृतीची माहिती करून दिली जाते , सध्या ही शहरे पाकिस्तानात आहेत! सध्या या जागा प्रत्यक्षात जाऊन पाहणे तसे फार (म्हणजे फारच! ) कठीण आहे.. तरी सुद्धा आपण वरळी येथील नेहरू सेंटर मध्ये सकाळी १० ते ५ या वेळात जाऊन तेथील अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकतो!! प्रस्तुत लेखमालिकेचा उद्देश हा माझा १ सदैव कुतूहलाचा विषय असणाऱ्या पाकिस्तान बद्दल आहे! आपण या लेख मालिकेत पाकिस्तानबद्दल अधिकाधिक जाणून घायचा प्रयत्न करणार आहोत!
आपल्याला माहित आहे पाकिस्तान हा स्वतंत्र देश होण्याआधी भारताचाच १ भाग होता! आता मात्र तो १ स्वतंत्र "इस्लामी" देश आहे.तसे या देशात आपल्याया बघण्यासारख्या पुष्कळ अश्या जागा / शहरे / वस्तू आहेत पण तरी सुद्धा प्रामुख्याने या देशातील काही प्रमुख शहरे पुढीलप्रमाणे ( ज्यांचा आपण धावता आलेख घेणार आहोत )
१. लाहोर
२. कराची
३. इस्लामाबाद
४. पेशावर
५. रावळपिंडी
तसे पाकिस्तान मध्ये अनेक अजून शहरे आहेत जिचे छोटे मोठे काहीतरी भारतीय इतिहासाशी जरूर संबंध आहे. आपण या लेख मालिकेत जास्तीत जास्त शहरांचा उल्लेख करून जास्तीत जास्त माहिती आपल्या "मराठी" भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे .चला तर मग पाकिस्तानाची सफर करूया !
मुक्काम पोस्ट "लाहोर" !
सर्वात प्रथम आज आपण "लाहोर" येथे जाऊन तेथील माहिती घेऊ! लाहोर हे जणू दुसरे पंजाबच आहे. खरे तर हे शहर आपल्या पंजाब राज्या पासून ( खासकरून अमृतसर पासून ) अतिशय जवळ आहे! फाळणीच्या सुमारास येथील सुपीक भाग हा पाकिस्तानच्या सध्याचं पंजाब प्रांतात गेला, तोच आहे सध्याचा लाहोर !! सध्याच्या इतिहासातून आपल्याला एवढे निश्चित माहित असेल ( अशी अपेक्षा जरूर करतो ) कि थोर क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू ,सुखदेव यांना लाहोर येथील जेल मध्ये २३ मार्च १९३१ साली सायंकाळी ७ ला फाशी देण्यात आली. वास्तविक अशी परंपरा आहे की कैद्यांना फाशीची शिक्षा ही दिवसा करण्यात येते , परंतु हाती आलेल्या बातमीनुसार गांधीजी या ३ क्रांतीकारकांची फाशी वाचवण्यासाठी व्होईसरॉय कडे मागणी करणार होते, व असे होऊ नये म्हणून त्यांना घाईघाईत फाशी देण्यात आली सायंकाळी! वास्तविक गांधीजींना वाटले असते तर ते त्यांची फाशी वाचवू शकले असते पण त्यांना तसे नाही जमले! इतिहास त्यांच्याशी हा प्रश्न नक्कीच करणार !
असो.. या ३ क्रांतिकारकांच्या स्मृतीला वंदन करून आपण आता लाहोर शहरात येउयात! सतलज नदीच्या काठावर वसलेले हे चांगलेच मोठे शहर आहे !! पुराणापासून आपल्याला उल्लेख आढळतो की या शहराची स्थापना भगवान राम यांच्या मुलाने म्हणजेच "लव" याने केली आहे! काही लोकांना हा पुरावा मान्य नसेल परंतु लाहोर येथील वस्तुसंग्रहालयात मात्र लाहोर हे शहर "लव" यानेच वसवल्याचा उल्लेख आढळतो! लाहोर ला जाण्यासाठी आपल्या कडे तसे खूप रस्ते आहेत ! आपण जी टी रोड ने ( म्हणजेच ग्रांड ट्रंक रोड) ने वाघा बोर्डर वरून लाहोर ला जाऊ शकतो किव्हा ट्रेन ने अमृतसर जंक्शन - अटारी - वाघा असे करत लाहोर ला पोचू शकतो ! मी अटारी , अमृतसर तसेच फक्त अर्धे वाघा ( कारण अर्धे वाघा पाकिस्तानात आहे) येथे स्वतः गेलो आहे !
मी ग्रांड ट्रंक रोड च्या प्रेमात !
मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा रस्ता शेरशहा ने बांधला आहे , हा रस्ता काबुल पासून कलकत्ता पर्यंत जातो ( म्हणजे पहा किती महत्व आहे या रस्त्याला ) . खरे सांगायचे झाले तर हा रस्ता किती सुंदर आहे हे तो प्रत्यक्ष पहिल्या शिवाय किवा तेथे जाऊन गाडी चालवल्या शिवाय समजणार नाही! माझ्या नशिबाने मला तेथे जायची संधी मिळाली! व त्या रस्त्याच्या मी प्रेमातच पडलो ! भारतातील "वाघा सीमारेषा" हा या रस्त्याचा शेवट आहे! तेथून पुढे १६ किलोमीटर वर अमृतसर व १६ किलोमीटर वर लाहोर आहे! मुख्य म्हणजे वाघा हे अर्धे पाकिस्तानात व अर्धे (कमीच) भारतात आहे! हा रस्ता आपल्याला लाहोर पासून पुढे पाकिस्तानातील मुख्य शहरे ओलांडून पुढे "काबुल" ला देखील नेतो !याच रस्त्यावून आपण लाहोर येथील शालीमार बागजवळ जातो व पुढे बादशाही मशिदी कडे जातो . ऐतिहासिक उल्लेख प्रमाणे हे मशीद एप्रिल १६७३ साली मोंगल राजा "औरंगजेबाने" बांधली आहे तसेच येथे १० लाख जण एकत्र नमाज पढू शकतात म्हणजे याच्या भव्यतेची आपल्याला कल्पना आली असेल
क्रिकेट डिप्लोमसी
पाकिस्तानचा मायदेशातील भारता विरुद्धचा सर्वाधिक उच्चांक ( कसोटी ) ६९९-५ याच "गद्दाफी स्टेडीयम" वर आहे , त्यांचा पूर्व कर्णधार इंझमाम उल हक़ चा वैयक्तिक उच्चांक ( कसोटी) ३२९ हा देखील याच मैदानावर आहे न्यूझीलंड विरुद्ध! पाकिस्तानचा एकदिवसीय सामन्यातील नीचांक ७५ ( विरुद्ध श्रीलंका ) देखील येथेच आहे! भारत येथे १३-१७ जानेवारी २००६ साली शेवटचा सामना खेळला , जो अनिर्णीत झाला , तसेच १३ फेब्रुवारी २००६ साली शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला ज्यात भारताने विजय साकारला. सामनावीर पुरस्कार मिळाला आपला सध्याचा कप्तान "महेंद्र सिंग धोनी ला " . या सामन्यात १ वाईट गोष्ट झाली ती म्हणजे आपला वंडरबॉय " सचिन तेंडूलकर" हा ९५ (१०४ चेंडू ) धावांवर बाद झाला ! त्याचे शतक ५ धावांनी हुकले ! असा आहे भारताच्या क्रिकेटचा संदर्भ आपण सध्या फिरत असलेल्या लाहोरमधील "गद्दाफी स्टेडीयम" शी !!सध्या आपल्याला माहीतच आहे की पाकिस्तानचा संघ डिसेंबर २०१२ साली भारताच्या दौऱ्यावर येत आहे ! असो !
सांस्कृतिक राजधानी
लाहोर ही पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी आहे! येथील माणूस हा प्रचंड आळशी व तितकाच मेहनती ( विरोधाभास ! ) स्वभावाचा आहे ! कष्ट व आराम करण्याच्या दोन्ही वृत्त्या त्याच्यात आहे ! लाहोर मध्ये तसे फिरण्यासारखे खूप काही आहे.. वाघा बोर्डर वरून सरळ सरळ पुढे आलो की आपल्याला शहरात प्रवेश होतो. लाहोर येथील वस्तू संग्रालयात गणपती बुद्ध इत्यादी हिंदू देवीदेवतांच्या मुर्त्या आढळतात! तेथे ऋषी वाल्मिकी यांचे मंदिर देखील आहे जेथे अजूनही दर्शनाला गर्दी होते ! मुख्य म्हणजे शीख लोकांनी सुद्धा १६६८ ते १८४६ पर्यंत लाहोर व राज्यं केले , मुख्य म्हणजे महाराजा रणजीत सिंग याची तर लाहोर ही राजधानिच होती ! त्यांची समाधी सुद्धा लाहोर लाच आहे तसेच शीख धर्माची गुरुद्वारा डेरा साख़ब, गुरुद्वारा काना काछ, गुरुद्वारा शहीद गंज, जन्म उस्तान गुरु राम दास, अश्या नावाची धार्मिक स्थळे देखील आहे. येथून आपण नंतर लाहोर चा किल्ला देखील पाहू शकतो जो "सम्राट अकबर " ने १५६० साली बनवला . येथे देखील दिवाणे आम आणि दिवाणे खास हा प्रकार आढळून येतो. येथील आलमगीर गेट मधून आपल्याला किल्ल्यात जावे लागते. किल्ल्याचं आत शिश महाल तसेच मोती महाल नावाच्या वस्तू आहेत! हा सगळा किल्ला "युनेस्को" च्या यादीत आहे.
येथे जहांगीर चा मकबरा पाहण्या सारखा आहे.. आपल्याला मोंगल साम्राज्याच्या इतिहासाची जाणीव करून देणारा आहे तसेच येथील ( मागे उल्लेख केल्या प्रमाणे) प्रसिद्ध जागा म्हणजे "शालीमार" उद्यान ! १६४१ साली शाहजान ने ही वस्तू बांधल्याचा उल्लेख आहे! नंतर अआपल्या पाहण्यात येते ती "हुजुरी बाग" या ठिकाण बद्दल सांगण्या लायक असे आहे की कोहिनूर हिरा हस्तगत केल्याच्या आनंदात अफगाणी शासक "शाह शुजा" याने याची निर्मिती केली! आपण आता जवळ पास सगळा लाहोर फिरलो आहोत ! कमीत कमी "युनेस्को " च्या यादीत सामाविस्था झालेल्या बहुतांश जागा तर पहिल्या आहेत आता आराम करून जेवून रात्रीचे लाहोर पाहू !
मी ग्रांड ट्रंक रोड च्या प्रेमात !
मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हा रस्ता शेरशहा ने बांधला आहे , हा रस्ता काबुल पासून कलकत्ता पर्यंत जातो ( म्हणजे पहा किती महत्व आहे या रस्त्याला ) . खरे सांगायचे झाले तर हा रस्ता किती सुंदर आहे हे तो प्रत्यक्ष पहिल्या शिवाय किवा तेथे जाऊन गाडी चालवल्या शिवाय समजणार नाही! माझ्या नशिबाने मला तेथे जायची संधी मिळाली! व त्या रस्त्याच्या मी प्रेमातच पडलो ! भारतातील "वाघा सीमारेषा" हा या रस्त्याचा शेवट आहे! तेथून पुढे १६ किलोमीटर वर अमृतसर व १६ किलोमीटर वर लाहोर आहे! मुख्य म्हणजे वाघा हे अर्धे पाकिस्तानात व अर्धे (कमीच) भारतात आहे! हा रस्ता आपल्याला लाहोर पासून पुढे पाकिस्तानातील मुख्य शहरे ओलांडून पुढे "काबुल" ला देखील नेतो !याच रस्त्यावून आपण लाहोर येथील शालीमार बागजवळ जातो व पुढे बादशाही मशिदी कडे जातो . ऐतिहासिक उल्लेख प्रमाणे हे मशीद एप्रिल १६७३ साली मोंगल राजा "औरंगजेबाने" बांधली आहे तसेच येथे १० लाख जण एकत्र नमाज पढू शकतात म्हणजे याच्या भव्यतेची आपल्याला कल्पना आली असेल
क्रिकेट डिप्लोमसी
पाकिस्तानचा मायदेशातील भारता विरुद्धचा सर्वाधिक उच्चांक ( कसोटी ) ६९९-५ याच "गद्दाफी स्टेडीयम" वर आहे , त्यांचा पूर्व कर्णधार इंझमाम उल हक़ चा वैयक्तिक उच्चांक ( कसोटी) ३२९ हा देखील याच मैदानावर आहे न्यूझीलंड विरुद्ध! पाकिस्तानचा एकदिवसीय सामन्यातील नीचांक ७५ ( विरुद्ध श्रीलंका ) देखील येथेच आहे! भारत येथे १३-१७ जानेवारी २००६ साली शेवटचा सामना खेळला , जो अनिर्णीत झाला , तसेच १३ फेब्रुवारी २००६ साली शेवटचा एकदिवसीय सामना खेळला गेला ज्यात भारताने विजय साकारला. सामनावीर पुरस्कार मिळाला आपला सध्याचा कप्तान "महेंद्र सिंग धोनी ला " . या सामन्यात १ वाईट गोष्ट झाली ती म्हणजे आपला वंडरबॉय " सचिन तेंडूलकर" हा ९५ (१०४ चेंडू ) धावांवर बाद झाला ! त्याचे शतक ५ धावांनी हुकले ! असा आहे भारताच्या क्रिकेटचा संदर्भ आपण सध्या फिरत असलेल्या लाहोरमधील "गद्दाफी स्टेडीयम" शी !!सध्या आपल्याला माहीतच आहे की पाकिस्तानचा संघ डिसेंबर २०१२ साली भारताच्या दौऱ्यावर येत आहे ! असो !
सांस्कृतिक राजधानी
येथे जहांगीर चा मकबरा पाहण्या सारखा आहे.. आपल्याला मोंगल साम्राज्याच्या इतिहासाची जाणीव करून देणारा आहे तसेच येथील ( मागे उल्लेख केल्या प्रमाणे) प्रसिद्ध जागा म्हणजे "शालीमार" उद्यान ! १६४१ साली शाहजान ने ही वस्तू बांधल्याचा उल्लेख आहे! नंतर अआपल्या पाहण्यात येते ती "हुजुरी बाग" या ठिकाण बद्दल सांगण्या लायक असे आहे की कोहिनूर हिरा हस्तगत केल्याच्या आनंदात अफगाणी शासक "शाह शुजा" याने याची निर्मिती केली! आपण आता जवळ पास सगळा लाहोर फिरलो आहोत ! कमीत कमी "युनेस्को " च्या यादीत सामाविस्था झालेल्या बहुतांश जागा तर पहिल्या आहेत आता आराम करून जेवून रात्रीचे लाहोर पाहू !
रात्रीची भटकंती
रात्र झाली की आपल्याला खरी आठवण होते ती जेवणाची ! खरे पाहता येथील रस्त्यावरचे जेवण तर आहेच मस्त ( कारण बहुतांश जनतेवर पंजाब चा प्रभाव पडलेला दिसतो) . येथील लोक प्रमुक्ख्याने मतान पेक्षा चिकन खाताना आढळतात .. "निकोल्सन रोड" वर तर अशी अनेक दुकाने आपल्याला पहावयास मिळतील .. लाहोर मध्ये चिकन व त्याच्या सकट खिमा + कलेजी इत्यादींचे खमंग स्टोल आपल्याला रस्त्यावर दुतर्फा पहावयास मिळतात ! खरे पाहता लाहोर मधल्या रस्त्यांवर रात्री याच "चविष्ट" वासांचे साम्राज्य असते ( आता अधिक वर्णन करत नाही.. श्रावण चालू आहे ना ! ) म्हणजे आपण कल्पना करावी की जो "खाण्याचा" शौकीन असेल त्याचे पोट निश्चितच रात्री रिकामे राहणार नाही लाहोर मध्ये !
येथील वस्तीत रात्री झगमगत असतो विशेषतः ईद किवा रमजान महिन्यात विशेषकरून येथील बाजार हा पाहण्या सारखा असतो!!
निरोप !
भारतातील वाघा बोर्डर पासून सुरु झालेला आपला प्रवास आता संपतोय,,आज मी व तुम्ही आपण दोघांनी पाहिलेला व अनुभवलेला "लाहोर" माझ्या डोळ्यात साठवून आता राजा घेतोय! कारण आता रात्री झोप घेऊन आता आपल्याला कराची कडे कूच करायची आहे !
तेव्हा भेटूच !
2 comments:
Good One! All three articles are nice!
thanks aditya ! mhanje tu pan firun aalas majhya barobar "pakistan" la :) :) :) :) :)
Post a Comment