Thursday, February 18, 2010
थरारक १३- २-२०१० .. !!!
थरारक १३- २-२०१० .. !!!
कॉलेज मधली परीक्षा संपवून... आम्ही कॉलेज चे मित्र फिरायला गेलो.. पुण्याला... १२ तारखेला.... खुप मजा केली.... धमाल केली....१३ तारखेला.. सिंहगडावर गेलो.. फिरायला...अगदी खडकवासला तलावात पोहलो सुद्धा... सगले काही झाले होते.. फ़क्त शौपिंग बाकी होते.. ते करायला ..आम्ही तिथल्या जानकार अणि माझा मित्र विक्की बरोबर गेलो ...
वास्तविक.. त्याने आम्हाला शौपिंग करण्या साठी बरेच उपाय सुचवले परन्तु आम्ही निवडला " कोरेगाव पार्क " उर्फ़ "के पी "
आम्ही ६ :४५ ला शनिवारवाडया जवळ पोचलो होतो.. ५ मित्र... तिथून अगदी १५ मिनटावर पुणे स्टेशन... असे करत करत.. पुण्याला पोचलो ७ वाजता... तिथून आम्ही ३-३ च्या ग्रुप मध्ये रिक्शा करून " कोरेगाव पार्क " ला जाणार होतो..३ जन दुसरीकडे गेले.. तर आम्ही ३घे रिक्शा शोधत शोधत कोरेगाव पार्क ला जायला निघालो..अणि असेच एक रिक्शा वाल्याला विचारले.. की कोरेगाव पार्कला येणार कर.. आम्हाला उत्तर मिलले की तिथे बोम्बस्फोट झाला आहे ! असे ऐकताच ..आम्ही खुप घाबरलो.. कारन रास्ता सुमसान झाला होता जवळपास.. असे म्हणून तो रिक्शा वाला निघून गेला.. आता आम्ही ३घेच मित्र.. एकते चालत होतो... रस्त्या वर कोणीही नव्हते... कुठे फसलो याची देखिल खबर नव्हती.. घरी फ़ोन लगत नव्हता.. सध्या काय परिस्तिथी आहे याची काहीच जाणीव नव्हती .. अणि तेव्हढ्यात पोलिसांची गाड़ी आली.. आम्हाला क्षणभर वाटले की आम्हालाच पकडायला आली आहे..परन्तु नंतर ती समोरून लगेच गेली...
आता ७ : ३० झाले होते .. रास्ता चुकून आम्ही ससून हॉस्पिटल जवळ आलो होतो.. तोच तिथे गर्दी जमलेली पहिली...माझा मित्र विक्की ला त्याची भारी उत्सुकता लागली.. तेव्हढ्यात समोरून दंडुका घेउन १ पुलिस आमच्या वर चालून आला.. ३रा मित्र सागर गायब झाला [:P] अणि मी जोरात पलालो.. पाहतो तर काय.. विक्की चा १ पाय गटारात अडकून तो पडला.. हसू येत असून ते आवरले.. अणि पोलिसा पासून त्याला वाचवले..आता आम्ही पुन्हा सुमसान रस्त्याला लागलो होतो..!
कशीबशी रिक्शा मिलाली हडपसर ला जायला.. त्यात बसून पाठी राहिलेल्या ३ मित्रांशी संपर्क साधून त्याना घटनेची जाणीव दिली.. आता आम्ही रिक्शातुन बघत होतो.. पुण्या चे लोक.. पटा पटा घराकडे निघत होते.. त्यांच्या चेहर्यावर १ भीती होती... अणि नकळत आम्ही सुद्धा त्यात सहभागी झालो ! कसे बसे घर गाठले.. पाठोपाठ मित्र ही आले...बस मधून .. त्याना बघून हायसे वाटले... कारन आता आम्ही बर्यापैकी सुरक्षित होतो हा थरारक अनुभव खरच अविस्मरनीय होता ! दुसऱ्या दिवशी देखील आम्ही ताबडतोब मुंबई गाठायचा निश्चय केला , व पहिली बस पकडून निघालो . सकाळपासूनच अनेक जणांचे फोन येऊ लागले, माझी एक मैत्रीण रसिका ने तर मला सकाळी सकाळीच फोन करून माझी चौकशी केली , खरेच बरे वाटले. माझ्या मनात अनेक विचार एव्हाना घुमू लागले होते , एवढा मोठा दहशदवादी हल्ला प्रथमच एवढ्या जवळून पहिला होता, मन सुन्न झाले होते , असा अनुभव परत कधीच येऊ नये अशीच प्रार्थना करत आम्ही घरचा रास्ता गाठला !
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
good one brother. Thats why you always take some one elder to you like "ME".
exellent ree mastach lihila aahes .. bhannat
मस्त
Post a Comment