Friday, February 26, 2010

सचिन .. रिजल्ट... अणि.. मी !


सचिन .. रिजल्ट... अणि.. मी !

"अरे निनाद आज आपला रिजल्ट आहे "!! मित्रांच्या तोंडून हे ऐकताच भारत अफ्रीका ची मैच ऐकण्यात गुंग झालेला मी गडबडलो ..टेंशन सुरु झाले... मैच तर केव्हाच बंद केली होती.. असा कॉलेज चा सगळा दिवस टेंशन मध्ये गेला.. संध्याकाळी घरी जाताना ट्रेन मध्ये मैच ची आठवण झाली... पण तूफान गर्दीतल्या ट्रेन मध्ये मोबाइल काडून मैच ऐकण्याची हिम्मत होइनत !

तेव्हढ्यात एकदाचे मुलुंड स्टेशन आले... गडबडित असलेला मी उतरण्याची तयारी करत होतो.. तोच माझा मित्र "हर्षद " मला जोरात बोला.. " अरे सचिन १९९ वर आहे " मला तर जणू वेड लागायची पाळी आली होती... क्षणाचा ही विलम्ब न करता ट्रेन मधून उतरलो.. रेडियो लावला अणि मैच ऐकत ऐकत चालू लागलो... आता आम्ही दोघे रोमांचित झालो होतो... १९९ करने म्हणजे जवळ जवळ अशक्यच ! आता घर जवळ येऊ लागले होते.. तरी सचिन च्या २०० चा कही नेम लागेना.. अणि तेव्हढ्यात सचिन चे २०० पूर्ण झाले ! मी अणि हर्षद ने हवेत उड्या मारल्या.. जोर जोरात ओरडलो.. आमचा आनद गगनात मावेनासा झाला होता... ! रस्त्या वरचे लोक जणू काही आम्हाला वेड तर नाही ना लागले असे बघत होते.. आजूबाजू चे सगले काही विसरून आम्ही दोघे जणू काही क्षणासाठी एका वेगळ्या दुनियेतच पोहोचलो होतो !

अणि ५० वी ओवर संपवून मैच संपली... आपण कुठे आहोत काय आहोत याचे भान दोघानाही येऊ लागले.. वास्तवाची जाणीव झाली.. अणि सगळ्यात महत्वाह्चे म्हणजे आज रिजल्ट आहे याची जाणीव झाली ! परत टेंशन सुरु झाले.. ! रिजल्ट चा विचार करत करत आम्ही दोघानी एकमेकांचा निरोप घेतला !

2 comments:

Harsh said...

saglyat mothi gosht mhanje tya shanasathi aamhi visarloz ki aaj result aahe....aani jashi sachinne double century marli aamhi dogha nazaila laglo toh anand asa hota ki aamhas navvad takke milale aahe pan ek gosht aahe jya divshi sachinne 200 marle tya divshi aamcha result kharab lagu shakat nahi evdha matra khara aani tasaz jhala

Kaun Banega RS ? said...

hmm harsh barobar bolas..! tujhya bolnyashi 100 % sahamat !