Sunday, November 20, 2011

अंतराळ !

अंतराळ !
आज एक वर्षांनी "अंतराळ - खगोलशास्त्र - परग्रही जीव " अश्या माझ्या आवडत्या विषयावर लिखाण करायचा योग आला आहे ! इत्तके वाचन + लिखाण करून सुद्धा माझ्या मनात प्रश्न येतोच कि या जगात आपण एकटे आहोत का! कि कोणी तरी आपल्याला बघ्टेल ? ऐकतेय किवा आपल्यावर नजर ठेवून आहे ! अश्या गोष्टींचा विचार करता करता माझे मन मला भूतकाळात घेऊन जाते ! जर परग्रही जीव खरेच आहेत आणि ते पृथ्वी वर आले तर काय होईल ? या बाबतीतील बहुतांश फिल्म्स मी पहिल्या आहेत ! त्यात एकच गोष्ट असते ते म्हणजे एक माणूस अंधाऱ्या रात्रीतून रस्ता हरवतो त्याला परग्रही जीव आपल्या सोबत नेतात ! खरे सांगू जर आपण परग्रही जीवांच्या दृष्टीने विचार केला तर मला या विषयात अजिबात स्वारस्य नसते ! कारण लाखो प्रकाशवर्षे प्रवास करून "पृथ्वी" वर आलेल्या परजीवी लोग फक्त एका माणसाला घेऊन जाणार नाही ! या कल्पनेत जरा सुद्धा दम नाही !


आता आपण येऊया परग्रही लोकांच्या अस्तित्वाच्या शक्यतेवर ! माझ्या मते तरी आपण याची पुढीलप्रमाणे विभागणे करू शकतो
) ते आपल्यापेक्षा प्रगत नसतील
) ते आपल्याहून अनेक पतीने प्रगत असतील

या दोन शक्यतांचा मी विचार का करतोय कारण )" जर ते आपल्या एवढे प्रगत नसतील तर आपण पाठवलेले संदेश त्यांना पोचले असतील तरीसुद्धा ते ऐकू किवा पकडू शकणार नाही "( इंजीनीअरिंग मध्ये आम्ही याला Encoding -Decoding असे म्हणतो ).. त्यांच्यासाठी आपले संदेश असे असतील जसे आदिमानवांसाठी विमानाची कल्पना !
आता आपण दुसर्या शक्यतेकडे वळूया ..या नुसार जर का आपण असे संदेश पकडले तर आपल्याला त्यांची चाहूल नक्कीच लागेल ! परंतु हे करणे करणे तितकेसे सोपे ( तसेच सुरक्षित) नाही ! कारण आपण याची काहीही हमी देऊ शकत नाही कि आपल्या पृथ्वी वर आलेले अंतराळ यान त्यातील प्रवासी हेय चांगल्या हेतूनेच आले असतील!

WOW सिग्नल

मग आता करायचे तरी काय .. ! या बाबतीतला एक चांगला किस्सा येथे सांगावासा वाटतो ! १६ ऑगस्ट १९७७ रोजी रात्री आकाश नियमित स्कॅन करताना आपल्या संदेशवाहक यंत्रणा ( SATELITES ) एक अजीबोगरीब सिग्नल सापडला.. असा प्रकारच्या संदेशफक्त परग्राहीच पाठवू शकत होते . या कॉम्पुटर ने हा आकडी कोड एकत्र करून त्या कॉम्पुटर संचालकाने ने सर्वात प्रथम तोंडातून उद्गार काढले ( WOW ) आणि तेव्हा पासून याच नावाने हा सिग्नल मशहूर झाला ! खरे पाहता तर हा ( RADIO ACTIVE _ materials ) ने बनला होता .. म्हणूनच हा संदेश इतका प्रसिद्ध झाला.. दुसर्या दिवशी ज्या भागातून हा संदेश आलेला त्याची काटेकोर पणे पाहणी करण्यात आली..अनेकदा उत्तर देखील त्या भागात पाठवले गेले.. परंतु काहीच हाती लागले नाही !

एक गोष्ट मात्र नक्की कि आपण असे अनेक सिग्नल्स पाठवू परंतु त्याला पोहचे पर्यंत १००-२०० पप्रजाशवर्षचा काळ जरी लागला तरी सुद्धा आपल्याला काहीही फायदा होणार नाही.. कारण तोवर ती संस्कृती अजून अद्यावत झाली असेल..तेव्हा तर ते या सिग्नल कडे लक्षही देणार नाही.. आणि जर दिले..लक्ष तर त्यासाठी त्यांनी आपल्याला उत्तर देखील पाठवले तरी परत आपल्याला १००-२०० वर्षे थांबावे लागणार.. तेव्हढ्यात ती संस्कृती नष्ट देखील होऊ शकते ! आपण मानवानी सुद्धा अणुबॉम्ब बनवण्याची कला फार लवकर आत्मसात केली ! खरे तर त्या संस्कृतीच्या विनाशाला खरी सुरवात होतील जेव्हा त्यांना समजेल कि........... (E =Mc Square)

स्टेफन हौकिंग यांचा एक विचार - (माझा छोटा प्रयत्न )

जगातील प्रसिद्ध खगोलशास्त्री स्टीफन हौकिंग यांचे डोके हे कॉम्पुटर पेक्षा जलद चालते ! यांच्या एका सिद्धातंता नुसार जर परग्रही जीव अतिप्रगत असेल तर ते एक योजना बनवतील.. त्यांच्या सूर्य भोवती ते छोट्या छोट्या आरश्यांच्या उपकरणाचे एक मंडळ बनवतील जेणे करून संपूर्ण सूर्य हा त्या आरश्यांच्या आवरणाने झाकून सर्व उर्जा साठवली जाईल.. अश्या प्रकारे या उर्जेचे जर आपण भागात समान विभागणी केली तर आपण विचार पण करू शकणार नाही अश्या प्रकारची उर्जा निर्मिती या प्रकल्पाने होईल.. जेणेकरून लांबचा पल्ला गाठण्य साठी आपल्याला आवश्यक असलेली उर्जा हे लोक अतिशय सहजतेने मिळतील.. त्या साठी गरज हवी फक्त उत्तम इंजीनीअरिंग ची त्याच प्रमाणे अद्यावत उपकरणांची.. मी देखील या विषयावर काही नोटस काढल्या होत्या त्याच आपल्या समोर ठेवत आहेत.. जर हा विचार खरा झाला तर परग्रहीना शोधण्याचे जटील काम हे ८०-८५ % सोपे होऊन जाईल! परंतु तरीसुद्धा आपला हा शोध चालूच राहणार आहे ! या पुढेही...पुढच्या लेखात ..!