Saturday, February 18, 2012

इंदिरा गांधींच्या घरात !


"१ सफदरजंग रोड"
नाव ऐकून काही आठवले का ? जर आपल्याला काहीच माहित नसेल तर या बातीत आपण "गूगल काकांची " जरूर मदत घ्या ! १ सफदरजंग रोड म्हणजे दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे निवास्थान .. दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाले तर तत्कालीन पंतप्रधान निवास ! माझ्या सध्याच्या इंजिनीरिंग कोलेज (कोंकण ज्ञानपीठ कोलेज ऑफ इंजिनीरिंग कर्जत) ची इंडसट्रील विजित हे दिल्ली - नैनिताल येथे गेली होती ! तर तेव्हा आम्ही दिल्ली येथे फिरत असताना चक्क १ अकबर रोड येते जाण्याची संधी चालून आली!

इंदिरा गांधींच्या घरात ! ( १ सफदरजंग रोड गेट च्या बाहेरून टिपलेले छायाचित्र )

घराबाहेर लावलेला माहिती फलक !

शुभ्र अश्या उच्चभू बंगल्याने आम्हास हेय इंदिराजींचे घर याची ओळख पटली ! आत कोणत्याही प्रकारची बाटली घेऊन जाण्यास परवानगी नाही तर आम्ही आमच्या जवळच्या बाटल्या बाहेर जमा केल्या आणि आत शिरलो ! स्वागत झाले इंदिराजींच्या दालनाने.. आत गेल्या गेल्या इंदिराजींच्या लहानपणा पासून ते मोठे पाणी पर्यंत चे फोटो आम्हास तेथे पहावयास मिळाले ! अगदी इंदिराजी जेव्हा शांतीनिकेतन मध्ये होत्या तेव्हापासूनचे !

इंदिरा गांधी यांचे अस्सल भारतरत्न पदक

इंदिरा गांधी यांच्या वापरातील काही खाजगी वस्तू

त्यांच्या पक्षाची हार जीत तसेच गोड आणि कटू प्रसंगांचे अतिशय उत्तम संकलन येथे करून ठेवले आहे ! माझ्या साठी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आत मध्ये फोटोग्राफी करण्याची परवानगी आहे ! मी मनसोक्त शक्य तितके फोटो काढून घेतले ! बहुदा जास्तीत जास्त फोटो हे कृष्णधवल होते ! तसेच जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेली काही पत्रे देखील येथे उपलब्ध होती !


इंदिरा गांधी यांच्या निधनाच्या दिवशी घातलेली साडी !

एवढे झाल्यावर आम्ही राजीव गांधी - सोनिया गांधींच्या कक्षाकडे वळलो ! इथे लिहिले होते कि संपूर्ण गांधी परिवार येथे अनेक वर्षे राहत होता ..इतक्यात मला इंदिराजींचे भारतरत्न पदक दिसले ते बघून मी राजीव गांधी च्या कक्षा जवळ आलो ! त्यांचे अनेक दुर्मिळ फोटो तसेच त्यांच्या वापरातल्या अनेक गोष्टींचे संघाहालायाच जणू मला पहावयास मिळाले होते ! यात सर्वात काही कटू मला दिसले असेल तर ती इंदिराजींची साडी जी त्यांनी ३१ ऑक्टोबर ला घातली होती त्यांच्या मृत्यू च्या वेळेसचे त्यांचे अखेरचे समान सुद्धा येथे जपून ठेवण्यात आले आहे ! सोनिया गांधी तसेच राजीव गांधी यांचे काही दुर्मिळ फोटो देखील येथे पहावयास मिळतात !!


मृत्यू समयी राजीव गांधी यांनी घातलेले बूट व मोजे

राजीव गांधी यांच्या जळालेल्या कपड्यांचे अवशेष !

राजीव यांचे सुद्धा अखेरचे कपडे तसेच त्यांच्या काही अखेरच्या वस्तू आपणास येथे पहावयास मिळतात ! सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या तो अर्धा जळालेला शर्ट देखील तेथे ठेवला आहे ! मला जेव्हढे शक्य होईल तेव्हडे मी आपल्या ब्लोग वर टाकत आहे ! आधीच छायाचित्रांसाठी माझे फेसबुक पेज पहा !
खरे सांगायचे झाले तर राजीव गांधी यांचे कक्षा बघताना वाईट जास्त वाटते ! कारण त्यांचे जळलेले कपडे त्याचप्रमाणे बुटांचे अवशेष बघून अतिशय वाईट न वाटले तर नवल ! त्यांची अंतयात्रा आणि राहुल गांधी हा आपल्या पित्याला अग्नी देत आहे हे पाहून खरेच वाईट वाटते ! नंतर आपण राजीव व सोनिया यांचे काही खाजगी फोटो दिसतात , त्यात राहुल - प्रियांका तसेच राजीव सोनिया हे सर्व कुटुंब एकत्र आनंदात आहेत असे पहावयास मिळते ! असे एकाच वेळेस दोन्ही दिसल्याने राजीव गांधींचा अकस्मात मृत्यू मनाला चटका लाऊन जातो !

येथेच इंदिरा गांधी गोळ्या लागून पडलेल्या !


सोनिया - राजीव

अखेर आणखीन काही वस्तू बघून आपण त्या प्रसिद्ध अश्या रस्त्याकडे जातो जेथे इंदिरा गांधीची हत्या झाली होती ! ज्या रस्त्यावरून त्या चालत गेल्या तो रस्ता आता काचेने पूर्णपणे बंद करण्यात आला आहे ( फोटो मधे समजेल ) तसेच ज्या ठिकाणी त्या गोळ्या लागल्याने पडल्या ते ठिकाण सुद्धा अधोरेखित केले आहे ! हा भाग झाल्यानंतर आपण बाहेरच्या द्वारापाशी येतो ! आत जाताना जी उत्सुकता असते ती कायम राहून गांधी परिवाराच्या अकस्मात जाण्याने मनाला चाटला लाऊन बाहेर पडते !
परंतु आता जास्त विचार करायला वेळ नसतो कारण खूप भूक लागली असते आणि "इंडिया गेट" खुणावत असते ! :D :D :D

[ टीप : - आपल्या ब्लॉग चे फेसबुक पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तेथे देखील लवकरच ब्लॉगवरील छायाचित्र टाकण्याची सुविधा करण्यात येणार आहे ! ]

3 comments:

नागेश देशपांडे said...

निनाद लेख आवडला. छान माहिती, फोटो ही छान आले आहेत.

UEH said...

सुंदर मांडणी. ब्लॉग खूप आवडला.
माझ्या माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत असलेल्या ब्लोग ला विझिट द्यायला विसरू नकोस
http://themarathi-blog.blogspot.in/

निनाद गायकवाड said...

Thanks नागेश दादा :)
तन्मय केणी - धन्यवाद :)