Sunday, September 25, 2011

लालबाग चा राजा - 2011

चिंचपोकळीचा चिंतामणी
श्री गणेशाय नमः !
दरवर्षी प्रमाणे गणपती उत्सवाची मी आतुरतेने वाट बघत होतो ! कारण या कालावधीत आपल्या ब्लॉग चा वाढदिवस असतो ! होय.. आपला ब्लॉग आता चक्क वर्षाचा झाला आहे ! वर्ष पूर्वी गणेश उत्सवात अगदी टाइम पास करत करत छोट्याश्या खोलीत सुरु केलेल्या या उपक्रमाचे आज ६००० हून जास्त भेटी आहेत ! या ब्लॉग ची सुरवात केली होती ती लालबाग च्या राजा च्या पोस्ट ने ! दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ही परंपरा कायम ठेवत आहे ! लालबाग च्या राजा च्या भेटीचा हा संक्षेप्त वृतांत !

राजा चे पहिले मुखदर्शन !
या वर्षी आमच्या लालबाग च्या राजाला जाणारी काही जुनी मंडळी आली नव्हती .. तसेच - नवीन मंडळी देखील आली ! ( ब्लॉग च्या पहिल्या पोस्ट मधेय उल्लेख केलेला विकास या वेळेस मात्र आला :D ) आम्ही मजल दरमजल करीत - ट्रेन सोडत सोडत अगदी आरामात करी रोड स्टेशन वर उतरलो ! सर्व प्रथम " चिंचपोकळीचा चिंतामणी " पहावयास गेलो.. करी रोड स्टेशन च्या दगडी पायर्या उतरल्या कि समोरच आपल्याला हा गणपती बाप्पा दिसून येतो !


रांगेत उभे असलेले !

त्याला नमस्कार करून आता आम्ही प्रत्यक्ष लाल्नाघ ला जाऊ लागलो होतो.. मधेय विविध खाण्याच्या पदार्थांच्या गाड्या दिसत होत्या ! मोह आवरून आम्ही चालत होतो ! आता आम्ही मुख दर्शनाच्या रांगेत शिरलो होतो ! गेल्या वर्षी सारखी चूक आता या वर्षी आम्ही मात्र गेली नाही ! गेल्या वर्षी आम्ही चुकीचं रांगेत शिरून मागे परत फिरलो होतो .. तसेच तडक घरी जायचा निर्णय घेतला होता ! परंतु देवावार्चाय भक्षी मुले आम्ही माघारी फिरलो परत मुख दर्शनाच्या रांगेत शिरलो आणि दर्शन घेतले ! अर्थात या वेळेस मात्र असे काहीही झाले नाही ! गेल्या वर्षी प्रमाणे या वेळेस सुद्धा आम्ही डोक्यावर "रंगीत शिंगे" घातली होती..! आता एका पाठोपाठ एक करत करत आम्ही एक -एक रंग सोडत चाललो होतो ! आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी प्रवेश केला ! आणि मला राजाचाची पहिली वाहिली झलक दिसली ! काय सांगू.. माझ्या मनातले सगळे सगळे काही संपले! माझी विचार करण्याची ताकदच जणू सुन्न झाली होती ! इतके विलोभनीय दृश्य होते ते !

साक्षात राजा !
दरवषी प्रमाणे लालबाग चा राजा या वर्षी सुद्धा मस्त दिसत ओत ! शेवटी राजाच तो आपला :) .. अश्या प्राकडे आम्ही बाप्पाचे दर्शन पूर्ण केले .. मला शक्य तितक्या जवळून तसेच शक्य तितके फोटोस काढून घायचे होते ! ते झाल्यावर आम्ही बाहेर आलो ! तहानलेल्या व्यक्तीला अचानक पणे पाणी मिळाल्यावर त्याची हालत कशी होते ? तशी आता आमची अवस्था झालेली ! आणि आता आम्ही मोर्चा वालाल्वा तडक "पेटपूजे" कडे !
दर्शन घेतल्या नंतर ची मुद्रा :)

लालबाग ला एवढ्या गर्दीत सुद्धा आम्हाला खायला चांगले हॉटेल मिळाले .. आत जाऊन बघतो तर फक्त पाव भाजी मिळेल असे कळले.. लगेच ओर्देर दिली तसेच तव मारला ! आमची पहिली ट्रेन :०७ ची होती ( कसारा ) आता वाजले होते :१५ ..! म्हणजे आम्हाला अजून ४५ मिनिटे तरी काहीतरी टाइम पास करावयाचा होता तर ! आणि आता आम्ही अजून एक गणपती बघितला .. आणि मग सरळ पहिली गाडी पकडून घरी गेलो !

घरी जाताना मनात असा विचार आला.. कि आज तर आपल्या ब्लॉग चा रा वाढदिवस आहे ! घरी गेल्यावर जरूर ब्लॉग लिहीन असा विचार करत करत मी आता निद्राधीन होऊ लागलो होतो ! :):):):):):):)

No comments: