Tuesday, August 30, 2011

चक दे !

चक दे !

ते आमचे स्वामी विवेकानंद पॉलीटेकनिक मधले शेवटचे वर्ष होते ! आमचे कोलेज चे फेस्ट " संस्कृती" एव्हाना सुरु झाले होते ! तेव्हढ्यात आम्ह्चे " स्पोर्ट्स " सुरु झाले होते ! आणि शेवटच्या वर्षाला असल्याने मी देखील यात भाग घेतला होता ..! प्रत्येक मुलाचे स्वप्न असते के त्याच्या संघाने क्रिकेट चा सामना जिंकावा..! कमीत कमी अंतिम फेरीत तरी नेऊन जावा ..! असेच स्वप्न उराशी घेऊन आमची इंजिनीरिंग ची शाखा मैदानात उतरली होती ! शेवटचे वर्ष असल्याकारणाने सर्वच जण अगदी जीव तोडून खेळत होते..! आमचा संघ बघून आम्हाला खात्री होती की आम्ही कमीत कमी (finals ) मधेय नक्कीच येऊ ! अन घात झाला .. आम्ही पहिल्या फेरीतच साखळी सामन्यात गारद झालो! स्वप्न भंग पावले! मी स्वतःच्या डोळ्यांनी पराभव पहिला.! शेवट चे वर्ष असल्याने आता रिकाम्या हाताने घरी जावे लागणार असेच वाटत होते ! ३ वर्षाची आराधना व्यर्थ गेली ! आणि नकळत डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या !

स्वप्न !

उद्विग्न अश्या मनस्थितीत मी बसलो होतो .. ! मला स्पष्ट दिसत होते .. कि ३ वर्षात आपण क्रिकेट मध्ये काहीच करू शकलो नाही ! आता आयुष्यभर आपल्याला हेच कटू सत्य घेऊन चालावेच लागणार ! तेव्हा अचानक आम्ही बसत असलेल्या जागेवर ( so called pavalian!) काही मुलीना मी क्रिकेट खेळताना मी बघीतले! नीट पहिले तेव्हा कळले कि त्या आमच्याच वर्गातल्या मुली होत्या ! आणि हे देखील कळले कि २ तासांनी आमच्या मुलींच्या संघाचा क्रिकेट सामना आहे ! आशेचे किरण माझ्या डोळ्यात चमकू लागले होते !

जिंकायची आशा !

वास्तविक मुलींच्या क्रिकेट संघाची हलत मुलांच्या संघ पेक्षा खराब ( म्हणजे अगदीच खराब) होती ! कारण धड संघ जागेवर नव्हता.. गेल्या २ वर्षापासून पहिल्या सामन्याला हरायची परंपरा आम्ही कायम ठेवली होती ! :)
आता सगळ्या संघाला बोलावण्यास मी एका मुलीला सांगितले.. ! कोणास ठाऊक कसे पण ५-१० मिनटात सगळा संघ हजर झाला ! आणि मग मी त्यांना शेवटच्या वर्षाचे महत्व सांगितले.. की हे शेवटचे वर्ष आहे ..! आपल्याला चांगल्यात चांगल्या आठवणी घेऊन जायचे आहे ! त्यांना मी मला साथ देण्याची विनंती केली व त्यांना अंतिम फेरीत नेण्याचे स्वप्न दाखवले !

नियोजन !

सरावाला सुरवात झाली होती !माझ्याकडे खूप कमी वेळ होता ! देवाने मला अजून एक संधी दिली होती..त्याचा पुरेपूर फायदा कसा उचलू हाच विचार मी करत होतो ! आणि असे करत करत मी माझी मैत्रीण " करिष्मा" हिला संघाची जवाबदारी दिली! करिष्मा एक उत्तम खेळाडू होती.. सर्वात महत्वाचे म्हणजे करिष्मा मधेय अतिशय उत्तम नेतृत्व गुण आहेत जे मी हेरले होते ! आणि तिच्यात संघाला बांधून ठेवण्याची क्षमता होती ! अश्या प्रकारे प्रतेय्काला त्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे मी संघात क्रमवारी दिली ! आणि बघता बघता पहा सामना झाला :D

आणि खरेच "करिष्मा" झाला !

पहिला सामना होता आमच्या पेक्षा लहान (इलेक्ट्रोनिक्स ) बरोबर ..ज्यांच्या बरोबर आम्ही पाठच्या वर्षी हरलो होतो ! आणि आम्ही नाणेफेक जिंकले .. मी सांगितल्या प्रमाणे करिश्माने प्रथम फलंदाजी चा निर्णय घेतला ! आणि काय सांगू काही तासांपूर्वी हर्लेल्यात जमा असलेल्या माझ्या संघाने दमदार सुरवात केली .. आमची सलामीची फलंदाज भावना ने तर तडक अर्धशतक ठोकले.. (मी सर्व आकडेवारी \ चुका \ दुरुस्त्या लिहून ठेवत होतो) भावनाने तडक ५४ धावा केल्या आणि करिष्मा देखील एका बाजूने किल्ला लढवत होती ! अश्या प्रकारे आम्ही ६ षटकात 72 धावांचे आव्हान समोरच्या संघाला दिले! मी मनोमन खुश होत होतो आणि प्राथना करत होतो ! आणि हळू हळू एक एक षटक जात होते.. आम्ही विजयाचं जवळ येत होतो.. आणि तो स्खन आला ! आम्ही हिंक्लो! होय आम्ही जिंकलो! २५ धावांनी ! प्रथमच विजय ! ३ वर्षातील पहिला विजय ! आणि आम्ही सार्वजन मी व आमच्या १५ मुली मैदानावर बेफाम नाचायला लागलो! जे मुलांनी ३ वर्षात नाही केले ते आम्ही करून दाखवले ! आणि अश्या प्रकारे श्री गणेशा आम्ही केला :D

स्वप्नाजवळ वाटचाल !

दुसरा सामना उपांत्य फेरी साठी होता . हा सामना आमचं बरोबरी च्या ( कॉम्पुटर ) शाखे बरोबर होता ! हा सामना काही चुर्सीचा मुळीच झाला नाही ! आम्ही नाणेफेक हरलो.. आणि आम्ही प्रथम गोलंदाजी केली! आणि...आज अपेक्षा भंग झाला..! आमची गोलंदाजी आज अतिशय सुमार होत होती.. मी करिश्माला जास्तीत जास्त प्रयोग करण्यास सांगितले होते ..कारण आम्ह इपाहीला सामना मित्या फरकाने जिंकलो होतो..आमची गोलंदाजी अतिशय सुमार झाली तरी कोणास ठाऊक आमचं समोरच्या संघाला जास्त धावा काढता आल्या नाही जेमतेम ३९ धावांवर त्यांचा डाव आटोपला ! आणि या वेळेस मी सांगितल्या प्रमाणे आम्ही प्रयोग करून बघितले नेहा आणि करिश्माला पाठवले.. आणि नेहा चमकली.. तिने उत्तम खेळ केला.. आणि काही चांगले फटके मारून सामना एकहाती जिंकावला..! आणि आमचे उपांत्य फेरीचे दरवाजे उघडले!

परिश्रम

कालच्या अनुभव वरून मी सर्वाना सकाळी लवकर बोलावले .. आणि सर्वाना खूप काही बारकावे समजावून सांगितले! त्यांच्या कडून खूप मेहनत करून घेतली.. अन्य टवाळ मुल जवळ येत आणि आमच्या या सरावाचं कार्यक्रमास बघून हसत ! मला त्यांची कीव येत असे! आमची सगळ्यात कमजोर बाजू गोलंदाजी आणि क्षेत्र रक्षण मी बर्या पैकी सुधारून घेतल्या होत्या ! आज उपांत्य सामना होता ! त्पुर्वी आम्ही एकत्र भोजन केले .. खरेच हसत खेळत तसेच आजच्या संन्या साठी प्राथना करत आम्ही त्या क्षणाची वाद बघत होतो !

उपांत्य सामना..!

नाणेफेक झाली.. आणि नशिबाने आम्ही नाणेफेक जिंकलो. पहिली फलंदाजी घेतली.. आजचा सामना ( इलेक्ट्रोनिक्स - वीडीओ इंजिनीरिंग ) बरोबर होता.. नानेफेकेचा कौल आमच्या बाजूने लावल्याबद्दल देवाचे आभार मानले! आणि सामना सुरु झाला ! आमची स्टार फलंदाज भावना चौकार सत्कार खेचत होती.. असे वाटत होते आज तिला रोखणे कठीण आहे ! करिष्मा चांगला खेळ करत होती! अन घात झाला करिष्मा धावबाद झाली! परतू तिची जागा लगेच नेहा ने घेतली आणि बघता बघता भावना चे अर्धशतक पुन झाले.. आणि तिचे ६६ रुंस झाले आणि सामना संपला.! आता त्यांची फलंदाजी होती.. गोलंदाजी ठीक ठाक झाली! अखेच्या षटकात १८ धावा जिंकायला हव्या होत्या ! कोणीही धजेना अखेरचे षटक टाकायला..मी हळूच करिश्माला इशारा केला की तू टाक.
पहिला चेंडू - निर्धाव.. सर्व जण आनंदले.. आता ५ चेंडूत १८ धावा हव्या होत्या.. आणि दुसरा चेंडू तडक सीमारेषा ओलांडून गेला ! होय तो एक षटकार होता! मी मैदानातून ओरडून फीलडिंग बद्दल सांगत होतो संघाला ! तिसरा चेंडू करिश्माने थोडासा आखूड टाकला ( बहुदा मी तिला बोललेलो की गोलंदाजीत विविधता ठेव ) आणि काय चमत्कार ! तिने चक्क बळी घेतला होता ! आता पुढील फलंदाजावर याचा नक्की परिणाम होणार हे मला दिसत होते ! ३ चेंडू १२ धावा..आणि हा चेंडू देखील करिश्माने निर्धाव टाकला ! मला आजू आठवते हा चेंडू टाकल्या नंतर तिच्या व बाकीच्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य !
आता २ चेंडू १२ धावा.. करिष्मा पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू टाकू पाहत होती. तेव्हढ्यात फलंदाजाने जोरात चेंडू खेचला.. आणि तो ....षटकार गेला..! काही वेळा पूर्वी स्थिर असलेले आम्ही आता पुन्हा धाकधूक सुरु होती! काय टाकू कसा टाकू हा विचार करिष्मा करत होती ! मी तिला तिथून बोललो..आरामात.. नीट टाक..घाबरू नकोस..आता १ चेंडूत ६ धाव हव्या होत्या आणि करिश्माने चेंडू सोडला ! आता काय होणार! १ चेंडू आमच्या अंतिम फेरीचं स्वप्नाच्या आड येत होता.. आणि फलंदाजाने चेंडू जोरात तडकावला आणि तो सीमारेषेच्या जवळ फोच्ला.. मला वाटले की आता हा षटकार जाणार किवा कॅच तरी पकडणार.. परुंतु सीमा रेशेवार्च्च्या मुलीने कॅच पकडला नाही ! परंतु षटकार सुद्धा जाऊ दिला नाही तिने जोरात चेंडू करिष्मा कडे फेकला.. आणि आम्ही चक्क ३ धावांनी सामना जिंकलो!
माझे व माझ्या संघाचे अंतिम फेरीत पोचण्याचे स्वप्न पूर्ण झाले ! आमचा आनंद गगनात मावेनासच झाला होता ..! काही काळ त्या आनंदात सामावून मी सर्वकाही विसरून गेलो होतो ..

No comments: