Saturday, July 30, 2011

अमृता सारखे अमृतसर - ३ ( वाघा बॉरडर )

अमृता सारखे अमृतसर - ३ ( वाघा बॉरडर )

आज आम्ही जाणार होतो अमृतसर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असणार्या " वाघा बोर्डर" ला ! प्रत्यक्ष पाकिस्तान ! आजवर भारतात अनेक ठिकाणी फिरलो परंतु पाकिस्तान बघण्याची ( लांबून का होईनात) संधी मला मिळणार होती ! त्याचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार होतो ! काय माहित परत कधी पहावयास मिळेल! आम्ही तेथे ( तसेच सुवर्ण मंदिरात ) जाण्यासाठी गाडी बुक केली होती ! यात आमच्या गाडी चा चालक "सुख" हा अतिशय मनमौजी तसेच उत्तर प्रकारे गाडी चालवण्यात माहीर असा होता ! वास्तविक तो त्याच्या स्वतःच्या व्यवसायाचा मालक होता .. परंतु माझा मित्र जसजीत च्या नात्यातला असल्याने तो आम्हाला अमृतसर फिरवण्यास आला ! त्याची तवेरा गाडी होती !
मधील प्रसिद्ध असा कुलचा !
अमृतसर मधील गोल्डन टेम्पल . दुर्ग्याना टेम्पल तसेच जालियानवाला बाग बघून आम्ही सगळ्यांनी मनसोक्त शॉपिंग केली.. तेथील प्रसिद्ध अश्या "कुलच्या" वर ताव मारला ! तसेच आता आम्ही बोर्डर कडे निघणार होतो ! जी.टी रोड ( ग्रांड ट्रंक ) आम्हास लागला होता ! अतिशय सुंदर रस्ता आहे .. हा पाहिल्यावर मुंबई पुणा एक्स्प्रेस हायवे चीच आठवण आल्या खेरीज राहत नाही !

वाघ प्रवेशद्वार( पाकिस्तान काही मीटर दूर)
आता हळू हळू फलक दिसू लागले होते वाघा २२किलोमीटर...वाघा १९किलोमीटर... वाघा १२किलोमीटर... आणि मग वाघा चे बोर्ड जाऊन चक्क " लाहोर २२किलोमीटर" असे बोर्ड लागायला सुरवात झाली ! इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते.. अमृतसर पासून वाघाचे जेव्हढे अंतर आहे तेव्हडेच लाहोर पासून वाघा चे आहे ! आता आम्ही भारताच्या शेवटच्या स्टेशन कडे आलो ! " अटारी " भारताची शेवटची हद्द ! जिथवर भारताची रेल्वे जाते! गम्मत म्हणजे "वाघा " रेल्वे स्टेशन हे पाकिस्तानात आहे ! म्हणून भारताची शेवटची हद्द म्हणजे " अटारी" स्टेशन ( गदर चित्रपट मध्ये देखील अमिषा पटेल याच स्थानकावर सनी देओल ला भेटते ! ) तिथून आम्ही वाघा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी आलो !
प्रत्यक्ष बॉरडरवर !

३ वाजले होते आणि गेट ५ वाजता उघडणार होते॥ मग आम्ही आसपास चा परिसर पहिला.. मला जितके शक्य होईल तितके डोळ्यात साठवून घेत होतो ! तिकडे आम्ही "अमिर्चंद" नावाच्या हॉटेल मालकाच्या हॉटेल मधेय जेवलो.. मी पैसे देत असताना त्याचं कडे १ विलक्षण गोष्ट बघितली ती म्हणजे "पाकिस्तान ची नोट"!
आपल्या नोटे च्या संग्रहात ठेवावी म्हणून मी ती चक्क ५० रुपयांना विकत घेतली ! आता ५ वाजले होते॥
पाकिस्तानी नोट !
माणसांची तुडुंब गर्दीतून आम्ही चालले होतो ! पंजाब पोलीस जागो जागी दिसत होते ! त्यात माझे मित्र जगदीप आणि जसजीत हे मस्ती करत होते.. आणि त्या गर्दीतून वाट काढीत आम्ही वागा बोर्डर च्या प्रवेशद्वार पाशी पोचलो ! तितक्यात तेथे बहुचर्चित " लाहोर बस" आली आणि गेली ! आता आवर चढू लागलो होतो आणि ..आणि.. मला पाकिस्तान दिसला !
भारतातील गर्दी( डावीकडील) व पाकिस्तानातील गर्दी(उजवीकडे )

खरेच काही म्हणजे काहीच फरक नव्हता इथल्या आणि तिथल्या भूमीत माणसे सारखी त्यांचा दिसणे .. कपडे रस्ते मोटारी पोशाख सगळे काही सारखे ! फक्त मनात दुरावा ! आणि अश्या वातावरणात आम्ही पोचलो ! जवळ जवळ १०ते २० हजार माणसे वाघा बोर्डर ला आली असतील भारताच्या बाजूने .. तर पाकिस्तान च्या बाजूला १०० -१५० माणसेच दिसत होती ! संध्याकाळच्या परेडला तिथे फारसा उत्साह दिसत नव्हता ! तसेच आता देशभक्ती पर गाणी सुउरू झाली होती दोन्ही बाजूला !
प्रत्यक्ष पाकिस्तान!
भारत झिंदाबाद .. पाकिस्तान झिंदाबाद असे एकमेकांच्या बाजूचे लोक ओरडत होते ! खरेच माझे लक्ष्य होते कि वाघा पलीकडे जास्तीत जास्त पाकिस्तान डोळ्यात सामावून घ्यावा !
तीठेय ४५ अंश तापमान होते अश्या गर्मीत ६:३० ला परेड सुरु झाली ! परेड मधेय सेनेचे जवान हे कसरती करत ..! तसेच तेथील गेट जोर जोरात आपटत असत ! आणि नंतर हेच सगळे काही पाकिस्तान च्या बाजूने देखील होत असे ! मला एका गोष्ट्चे कुतूहल वाटले पाकिस्तान आज पर्यंत एकही लढाई जिंकला नाही मग ते देशभक्ती पर गीत कसे म्हणत असतील!

प्रत्यक्ष पाकिस्तान!
हा खोडकर विचार मनात आणत बाजूला नजर फिरली आता भारताचा एक सैनिक पाकिस्तानात गेला आणि पाकिस्तानचा एक भारतात आला त्याने दोन्ही झेन्द्याना प्रणाम केला आणि एकमेकांनी झेंडा खाली काढला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम संपला ! अश्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडला !
भारतात आपले स्वागत आहे !

परत येताना आम्ही जी।टी. रोड वरून अतिशय सुसाट वेगाने येत होतो॥ आमचा चालक सुख हा आपले गाडी चालवण्याचे कौशल्य आम्हास दाखवत होता ! जाता जाता मी तिथून पाकिस्तानातून भारतात आणलेला एक दगड या सहलीची आठवण म्हणून घेतला !गाडीत बसून विचार करत होतो की फक्त एका दिवसात पार पडलेली आमची हि सहल अतिशय यशस्वी झाली तसेच आता दुसर्या दिवशी हिमाचल प्रदेश मला खुणावत होते :) :)
हिमाचल कि ओर !
वाघा बोर्डर विषयी
१) भारताचा एक शिवाई पाकिस्तानात जातो तसेच तिकडचा इकडे येतो !

२) वाघा बोर्डर ला तिकीट नाही
३) ६:३० ला कार्यक्रम सुरु होतो !
४) शिवीगाळ ( पाकिस्तान बद्दल) करण्यास मना आहे !
५) १४ ऑगस्ट ला आपल्याला ( भारतातील लोकांना ) एका ठराविक अंतरा पर्यंत ( बहुदा कस्टम ची चौकी) पाकिस्तानात जाता येते !
६) आता तर उच्च हुद्द्या वरील दोन्ही कडेचे अधिकारी बिनदिक्कत कधीही बोर्डर पार ये-जा करतात !
७) २६-११ च्या नंतर निर्माण झालेल्या कटू संबंध नंतरही दोन्ही देशांची आयात निर्यात "वाघा " बोर्डर वरून सुरु आहे ( मी आणलेला दगड ! )
८) वाघा बोडेर हि बरतात असली तरी स्टेशन हे पाकिस्तानात आहे !
९) वाघा बोर्डर वर भारताची सीमा १८०अन्श आहे ( पहा गुगल अर्थ किवा पंजाब चा नकाशा )
१० ) जी टी रोड ची हद्द वाघा ला संपते ( भारत ) आणि वाघा ( पाकिस्तान पासून) चालू होते ते पुढे लाहोर पर्यंत!
११) वाघा बोर्डर ला च भारताचे शेवटचे पोस्ट ऑफीस आहे ( अटारी पोस्ट ऑफीस )

2 comments:

tushar said...

तुझा ब्लोग खुपच छान आहे मित्र. .


तुषार ठाकूर

BE INST KGCE

Piyush Nashikkar said...

मित्रा तुझा ब्लाॅग खुपच सुंदर अाहे.