Tuesday, July 12, 2011

अमृता सारखे अमृतसर :) :) - २





अमृता सारखे अमृतसर :) :) - २


शहीद उधम सिंग

आज आपण बोलणार आहोत जालियानवाला बाग बद्दल . असा भारतीय आपणास शोधूनही सापडणार नाही ज्याला या घटने बद्दल काहीही माहिती नाही ! खरेच किती क्रूर घटना होती ! कशी घडली असेल..? कसे त्या शिपायांच्या बाहूत निष्पापांना मारण्याचे बळ आले असेल ! खरेच ..आज आपण त्या घटनेला भारतीय इतिहासातील सर्वात काळा दिवस मानतो..! आमच्या नशिबाने आम्हास या पवित्र अशा जालियानवाला बागेत जाण्याची संधी चालून आली ! या संधीचे मला खरेच सोने करून घ्यायचे होते !

हीच ती जालियानवाला बाग
मागील लेख प्रमाणे सुवर्ण मंदिरा ची भेट घेऊन झाल्यानंतर आम्ही ठरल्या प्रमाणे जालियानवाला बागे कडे निघालो! सुवर्ण मंदिरा पासून २ मिनीटाचा रस्ता आपणास जालियानवाला बागे कडे घेऊन जातो ! इथे प्रवेश करण्या साठी मेटल डीटेकटर ची व्यवस्था केली आहे पण ते चालू स्थितीत नाही.. इथून आत गेल्यावर आपल्याला १ चिंचोळीशी गल्ली लागते .. खरेच खूप छोटीशी आहे हे गल्ली इथेय पोहोचल्यावर आपणास माहिती फाकल दिसतो कि " याच रस्त्यावरून ( गल्लीतून) जनरल डायर आपल्या सैनीकान समवेत आता आला होता.. " आणि अश्या रस्त्यातून आत आल्या वर आपल्याला प्रसिद्ध अश्या आजच्या हिरवळीने नटलेली जालियानवाला बाग दिसून येते..
जनरल डायर याच मार्गाने आला !

आता आपण आता आलो आहोत इथून उजवी कडे १ अमर ज्योत आहे जी सतत तेवत होती.. हे इथल्या शाहिदन साठी एक आठवण म्हणून तेवत ठेवली आहे . . आपल्या भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना मला असे आढळून आले होते कि पंजाब मधे " सरदार भागत सिंग" येथे लहान पाणी आले होते आणि त्यांनी याच जालियानवाला बाघे ची माती आपल्या बाटली मध्ये भरून ठेवली होती ..जी त्यांना पुढे अतिशय प्रेरणादायी ठरली ! परुंतु आज या जागेचे रूप अगदी पालटून गेले आहे !
अमर ज्योत
आता इथे डाव्या हाताला एक जागा आहे जिला शहिदी कुवा असे म्हणतात . जनरल डायर ने गोळी बार सुरे केल्यानंतर त्या पासून वाचण्यासाठी लोक या विहिरीत उडी मारू लागली !

शहीदी कुवा
नंतर या विहिरीतून अनेक शव बाहेर काढण्यात आले ! मी मोठ्या भक्तिभावाने या पवित्र जागेचे दर्शन घेतले! आज या बाघे च्या अगदी मधोमद शहीद स्म्रारक उभारण्यात आले आहे !
हाच तो शहीदी कुवा

नंतर अजून २ जागा बघण्य सारख्या आहेत. इथेय एक मैला चा दगड लावला आहे ज्यावर लिहिले आहे कि लोकांना गोळ्या इथून चालवण्यात आल्या ! खरेच कधी गेलात टर त्या जागेवर उभे राहा..! आपल्याला कसे वाटेल याचे वर्णन करणे शक्य नाही !
जालियानवाला बाहेत आज गोळ्यांचे निशाण जतन करून ठेवले आहेत त्या दिवसाची आठवण म्हणून ! आम्हाला ते निशाण देखील बघायला मिळाले!

लोकांना येथून गोळ्या घालण्यात आल्या !
अंगावर काटा आल्या शिवाय राहवत नाही हे एवढे पाहून ! जाता जाता आता इथेय नवीन वाट केली आहे बाहेर जाण्या साठी ( पूर्वी एकः वाट होती म्हणून जनरल डायर ने गोळीबार केल्यावर कोणी पळून जाऊ शकले नाही ) आता या वाटेने बाहेर पडल्यावर तेथे १ छोटेसे संग्रालय आहे जेथे शहीद उधमसिंग ( ज्याने जनरल डायर ला मारले) त्याच्या अस्थी ठेवल्या आहेत..!

गोळ्यांचे निशाण ( व मी ! )

या जागेवर फोटो काढण्यास परवानगी नाही..! असे करत करत संपूर्ण बाग फिरलो आणि मनसोक्त फोटो काढले ..! एकूणच आधी सुवर्ण मंदिर आणि आता जालियान वाला बाग !
मजा येत होती.. हळू हळू पंजाब मला आवडू लागला होता ! आता शहीदाना वंदन काढून आमची पावले वल्ली होती भारत पाकिस्तान सीमे कडे..! म्हणजेच पुढील लक्ष " वाघा बोर्डर " ! (पुढील भाग )

आम्ही सगळे मित्र जालियान वाला बागेतील स्मारका जवळ !

2 comments:

Varsha said...

Despite the signs telling you that photography is not allowed, you photographed and did not even feel ashamed of declaring so. People like you, who bring even minor rules like this are responsible for the state of current India. When will you grow up????

निनाद गायकवाड said...

वर्षा ताई , तुझ्या मतांचे स्वागत आहे ! तुला ज्या गोष्टीवर आक्षेप आहे त्या फोटो ग्राफ्य बद्दल मी २ मुद्दे सांगू इच्छितो ,

१) "या जागेवर फोटो काढण्यास परवानगी नाही..! असे करत करत संपूर्ण बाग फिरलो आणि मनसोक्त फोटो काढले ..! एकूणच आधी सुवर्ण मंदिर आणि आता जालियान वाला बाग !
मजा येत होती.."
हा उतारा वाचून तुझ्या मनात काही शंका उपस्थित झाल्या असतील तर त्या दूर करतो.!
फोटो च्या आधी हे वाक्य मी लिहिले होते ते चुकून दुसर्या उताऱ्यात प्रसिद्ध झाले.!

२) फोटो ची परवानगी नसताना उधमसिंग यांचा फोटो कसा आला हे कुतूहल तुला आले असेल.. याचे उत्तर देतो ते म्हणजे शहीदि कुवा या जागे जवळ उधम सिंग यांची तसबीर आहे तिथला हा फोटो आहे !
तसेच पुढील पोस्त मधेय जो गुरुग्रंथ साहेबांचा फोटो आहे तो देखील तिथल्या गुरुद्वारातील आहे ! हा फोटो परवानगी घेऊन काढला आहे !

३) मी किवा माझ्या कोणत्याही मित्राने फोटो काढण्याची परवानगी नसताना कुठल्याही वस्तूचा अथवा व्यक्तीचा फोटो काढलेला नाही ..आणि काढणारही नाही :)