Sunday, April 29, 2012

वा महागुरू !



खरे पाहता मी "मराठी" मालिकांपासून १० हात दूरच असतो ! आजकाल च्या मराठी मालिका या बघण्यालायक नसतात असेच माझे ठाम मत होते जेव्हा पासून मी " दिल्या घरी तू सुखी राहा" चा १ भाग चुकून पहिला ! त्यामुळे उरला - सुरला क्षणी सुद्धा मी मराठी वाहिनीवर फिरकत नसे ! असेच एकदा चुकून माझ्या नजरेस "मी मराठी" या वाहिनी वरील " बोले तो मालामाल" हा कार्यक्रम नजरेस आला .. ! बघण्याचे कारण म्हणजे त्यात मी " महागुरू - सचिन पिळगावकर " यांना बघितले . आणि रिमोट खाली ठेवून तो कार्यक्रम बघू लागलो ! 


वास्तविक मला या कार्यक्रमाची कल्पना मुळीच माहित नव्हती , तरी बघता बघता समजले कि "टिटवाळा " येथील १ कुटुंब आले होते ज्यांचा मुलगा हा प्रचंड आजारी होता.. तरीसुद्धा ते कुटुंब आपल्या मुलासाठी - त्याच्या औषधोपचारासाठी धडपड करत होते ! खरेच ते पाहून मन थक्क झाले! आता कल्पना अशी होती कि महागुरू सचिन पिळगावकर हे त्या कुटुंबाच्या दुकानात जाऊन एका दिवसासाठी ते जो व्यवसाय करणार तोच करणार,.. आणि मुद्देमालाची रक्कम वजा करून + तसेच फोटो + स्वाक्षरीचे पैसे पकडून त्यांना १०० ने गुणून ती रक्कम त्या कुटुंबास देणार ! 

ठरल्याप्रमाणे सचिन पिळगावकर हे आधी टिटवाळा येथील गणेश मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनास गेले व "गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात तेथून ते तडक त्या दुकानात व्यवसाय करण्यासाठी गेले ! त्यांच्या दुकानात त्यांना १ मदतनीस देण्यात आला ! आणि त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला ! खरे पाहता सुरवातीला त्यांचा व्यवसाय होण्याआधी लोक नुसते त्यांना पाहण्यात गुंग झाले ! तेव्हा त्यांनी काहीश्या "करड्या" स्वरात लोकांना सांगितले " नुसते बघायला म्हणून येथे उभे राहू नका किवा हात मिळवू नका " तेव्हा भानावर येऊन लोकांनी सुद्धा पटापट आपल्या सामानाची खरेदी केली ! 




सचिन यांच्या कडून अनेकांनी मंदिरातील पूजेचे साहित्य त्याचप्रमाणे तसबिरी + मूर्ती इत्यादी गोष्टी खरेदी केल्या ..त्याच प्रमाणे त्यांच्या सोबत फोटो काढण्या साठी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली ! येथे सांगण्याचा मुद्दा असा कि १ वाहतूक पोलीसही या कामात मदत करून गेला ! आता मात्र सायंकाळ होत आली ..! परतीचा प्रवास सुरु करायचा होता.. परंतु जाता जाता या चांगल्या कामाला तेथील काही पोलीसानमुळे गालबोट लागले ! परंतु जाता जाता सचिन देखील समाधानी अंतकरणाने जात होते !
                                              
आता व्यवसाय झाला होता.. मुद्देमाल ची रक्कम वजा करून जवळ जवळ १००० रुपयांचा नफा झाला होता आणि त्याला १०० ने गुणून त्या कुटुंबाला जवळ जवळ १ लाख रुपये मदत म्हणून मिळाले ! सचिन पिळगावकर सुद्धा या प्रसंगी आपले भाव लपवू शकले नाहीत ! २००९ साली मी स्वत "सचिन पिळगावकर " यांना  एका कार्यक्रमा दरम्यान बघितले आहे... खरेच एखाद्या गरजूला मदत करण्या साठी एक सुपरस्टार असे देखील करू शकतो हे माझ्या साठी खरेच नवीन होते ! 
जाता जाता सचिन पिळगावकर यांचे एक वाक्य जे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले ते म्हणजे,
" मी सेलीब्रीटी आहे ! म्हणजे कोणी मोठा माणूस नव्हे , तर असा माणूस ज्याच्या सोबत तुम्ही नेहमी कोणताही क्षण हा सेलीब्रेट करू शकता !  "

No comments: