Thursday, March 8, 2012

हरवलेले महान भारतीय !

"बोधीधर्म" हे नाव कधी ऐकले आहे का ? हो मराठी मंडळी मी आपल्यालाच विचारात आहे याबाबत ! नसेल तर गूगल काकांच्या मदतीने जरूर माहित करून घ्या ! अच्छा, तुम्ही "मार्शल आर्ट्स " बद्दला नक्कीच ऐकले किवा बघितले असेल ! ( जाकी चेन किवा ब्रूस ली आपल्या चित्रपटात जे करतात ते ) अर्थात त्यांचे चित्तथरारक कर्तब पाहून आपल्या तोंडात बोट नाही गेले तरच नवल ! मग आपल्याला कधी प्रश्न नाही पडत का या लोकांना कुठून मिळाले असेल हे ज्ञान ? कोणी शिकवले असेल ? कोणत्या तरी चीनी ऋषींनी ? कि कोणत्या तरी बौद्ध भिखुनी ? याचे उत्तर आहे "एका भारतीयाने" !

बोधीधर्म यांचे चीन मधील छायाचित्र
होय ! तुमच्या प्रमाणे मला देखील विश्वास बसला नाही ! कि या सर्वांच्या मागे आहे १ भारतीय व्यक्ती त्यांचे नाव आहे " बोधीधर्म " वास्तविक हे कांचीपुरम च्या एका राजा चे ३ रे सुपुत्र ! यांनी अतिशय कमी वेळात सर्व शास्त्रात लक्षणीय प्रगती केली व अकस्मात केली !आणि अश्या प्रकारे औषध+युद्ध+कला इत्यादी अनेक क्षेत्रात ते निपुण झाले ! तसेच त्यांच्या गुरु ने त्यांना भविष्यवाणी केली कि "चीन " मधे १ महाभयानक संकट येणार आहे तर तेथील जनतेचे रक्षण करण्या साठी आपण स्वतः तेथे जावे व तेथील लोकांना अभय द्यावे ! अश्या प्रकारे गुरूची आज्ञा मानून त्यांनी भारत ते चीन अशी यात्रा करीत चीन गाठले. तेथील लोक त्यांच्या मदतीने त्या संकटांवर मत करतात ! ते त्यांना मार्शल आर्ट्स त्याच प्रमाणे ध्यानधारणा करावयास शिकवतात ! बोधीधर्म तेथेच " शाओलीन मंदिरा" ची स्थापना करतात !


शाओलीन टेम्पल

आता आपण पुरातन काळातून परत २०१२ मध्ये येउयात ! वेळ दुपारचे ३ वाजलेले . मी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारत होतो तेव्हढ्यात चित्रपटांचा विषय निघाला.. आणि अश्या प्रकारे माझा १ तमिळ मित्र मला त्यांच्या भाषेतल्या "7 am arivu" या चित्रपट बद्दल सांगू लागला. वास्तविक मला तो जे काही बोलत आहे ते न पटणारे होते ! शेवटी त्याचे बोलणे ऐकून मी देखील गूगल काकांची मदल घेतली ! आजचा सुट्टीचा दिवस फुकट न घालवता काहीतरी चांगल्या गोष्टी बद्दल शोध घेऊन माहितीत भर करावी असेच मला वाटले ! (या चित्रपटाच्या कथे बद्दल अधिक माहिती साठी येथे टिचकी द्या )
प्रस्तुत चित्रपट हा "बोधीधर्म " यांच्या वर बनलेला चित्रपट होता , सुरवातीची १५-२० मिनिटे सोडले तर बाकी चित्रपटाचा इतिहासाशी काहीही एक संबंध नाही !
(पुढे मला असेही आढळून आले कि २०११ च्या दिवाळीत याने रा.वन हून अधिक कमाई केली!असो!)


हाच तो चित्रपट

परंतु दुर्दैवाने मला महान भारतीय "बोधीधर्म " यांच्या बद्दल अतिशय थोडीच माहिती मिळाली.. कारण इंग्लिश मधील माहिती खूप मोठी व किचकट आहे त्याच प्रमाणे जपानी तसेच चीनी भाषेत त्यांची माहिती उपलब्ध आहे ! परंतु ती भाषा वाचणे म्हणजे बिरबलची खिचडी शिजवण्यासारखे होते मला !आज आपल्या इंटरनेट वर खरेच बोधीधर्म यांच्या बद्दला खूप कमी साहित्य उपलब्ध आहे जे सामान्यांना वाचण्यास उपयोगी पडेल , त्यांचा इतिहास त्यांनी काय काय केले तसेच त्यांच्या बद्दल मिळेल ती माहिती साठवून एकद्हा माहितीकोश तयार करता येईल ! कारण आज चीन ज्या ज्या सगळ्या गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे त्या त्यांना "बोधीधर्म" यांच्या कडूनच शिकता आल्या ! परंतु मला असे काही साहित्य किवा माहिती सोप्प्या सरळ भाषेत मिळाली नाही !परंतु "नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यू च्या रहस्यावर ज्या प्रमाणे मी शोध करून लेख लिहिला होता त्याच प्रमाणे "बोधीधर्म" या महान भारतीय राजा वर सुद्धा लेख लिहायची माझी प्रचंड इच्छा आहे त्यामुळे मी आता त्यांच्या बद्दलची माहिती जमा करायला सुरवात केली आहे ! वास्तविक पाहता मला आज अपयश आले असेच म्हणावे लागेल ! तरीसुद्धा माहितीच्या महासागरातून १ थेंब का होईना शोधल्याचा अभिमान माझ्याजवळ आज होता !

बोधीधर्म यांचा पुतळा

वास्तविक पाहता चीन हा जागतिक महा सत्ता होऊ इच्छितो परंतु येथे उल्लेख करण्या लायक गोष्ट अशी कि यासाठी त्याला सगळ्यात जास्त मदत पुरातन काळापासून ज्याने केली तो दुसरा तिसरा कोणीही नसून त्याचाच शेजारी देश "भारत " आहे ज्याला तो काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथील सीमा वादावरून डोकेदुखी ठरतो आहे ! दुर्दैव !

No comments: