
अमृता सारखे अमृतसर :) :) - १
परीक्षा संपल्या नंतर आम्ही उत्तर भारत फिरण्याचे ठरवले..! त्याचप्रमाणे परीक्षा संपल्या संपल्या घाई घाईत आम्ही सगळी प्लानिंग अगदी काटेकोरपणे केली ! आणि निघालो भारत शोधायला :) आमचा पहिला पाडाव होता पंजाब ! प्रस्तुत लेखात आपल्याला पंजाब बद्दल काही गोष्टी आवर्जून सांगाव्याश्या वाटतात ! ३ दिवसांचा प्रवास करत करत आम्ही अमृतसर ला पोहचलो !

काय सुंदर शहर..! त्याच्या सुंदर तेचे वर्णन करता करता माझा ब्लोग भरून जाईल! खरेच एखादे शहर इतके सुंदर असू शकते याचा कधी प्रत्यय आला नव्हता !

धार्मिक वातावरणात रुजणारी माणसे अगदी मानाने देखील खूप चांगली आहे ! तिथे पोचल्या नंतर आमचा प्लान होता "सुवर्णमंदिर " फिरण्याचा ! खरेच काय सांगू.. इतकी सुंदर जागा भारतात असू शकेल असे वाटले नव्हते.. सर्व बाजूनी पांढर्याशुभ्र इमारतींचे कवच असेले आणि मधोमध स्वच पाण्याचे तळे आणि सुवर्णमंदिर ! आहा ! क्या बात है ! खरेच सुवर्णमंदिर ला जाऊन फक्त शरीर नाही तर मन पवित्र होते!

एखाद्या चांगल्या कामासाठी काम करणारी पुष्कळ मनुष्ये तेठेय काम करताना मी बघितली! त्यास पंजाबी भाषेत " लंगर" असे संबोधतात असे माझा पंजाबी मित्र मला म्हणाला ! आम्ही मंदिरास संपूर्ण प्रदक्षिणा घातली तसेच त्या सरोवरात देखील उतरलो ! २००६ साली आलेल्या रंग दे बसंती या चित्रपट हे सरोवर मी नीट पाहीले होते . कारण त्यात त्या चित्रपटातील नायक सुद्धा त्यात स्नान करताना दाखवले आहेत! आम्ही देखील त्या सरोवरातील पवित्र पाणी आमच्या माथ्याला लावले व पुढे चालत राहिलो ! नंतर आम्ही पंजाब मधील सर्वात "शक्तिशाली" जागा पाहीले जिचे नाव आहे "अकाल तख्त " ..!

आम्हास सांगितल्या प्रमाणे तीठेय शिखांचा पवित्र ग्रंथ " गुरु ग्रंथसाहेब" ची मुळप्रत ठेवण्यात आली आहे ! दर सायंकाळी ही प्रत सोन्याच्या पालखील घालून वाजत गाजत सुवर्ण मंदिरात ठेव्यात येते! येथे फोटो काढण्यास परवानगी नसल्याने आम्हास फोटो काढता आला नाही ! परुंतु एकूणच मजा आली ! येथे २-२ तासांची रांग असते सुवर्ण मंदिरात दर्शन घेण्यासाठी ! परंतु एकूणच वस्तू पवित्र आहे..! सामाजिक कार्यासाठी काम करणारी भरपूर माणसे आहेत !

जाता जाता खटकणारी एकाच गोष्ट वाटली ती म्हणजे मंदिर परीसतात खलिस्तानी आतंकवादी " जर्णेल सिंग भिंद्रनवाले " याच्या भरपूर प्रतिमा दिसल्या ! हे पाहून खूप वाईट वाटले.. आजही पंजाब मधेय भिन्दनवाले या न त्या रुपात जिवंत आहे याचा प्रत्यय आला..! यावर तर कहर म्हणजे आम्ही एका दुन्कानात "भिंद्रनवाले " याच्या नावाचा छातीवर लावण्याचा बिल्ला बघितला.. ! त्यावर चक्क लिहिले होते " संत" भिंद्रनवाले ! हेय पाहून मला वाईट वाटले..!

पण एकूण तो दिवस सुवर्ण मंदिर आणि परिसर पाहून सत्कारणी लागला..! पुढील आयुष्यभर मला शुभ्र पाण्यात चकाकणारे सुवर्णमंदिर चे कळस कधी विसरता येणार नाही हेय मात्र नक्की ! :) :) :)

No comments:
Post a Comment