Thursday, April 16, 2015

पासपोर्ट टू प्लुटो !


आपल्या सौरमालेतील अनेक ग्रहांबद्दल अनेक लेख लिहिले जातात , परंतु एके काळी ग्रह असलेला प्लुटो बद्दल मात्र उलट आहे ! खरेतर प्लुटो बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे , इतकेच नव्हे तर १९३० मध्ये शोध लागल्या पासून आजतागायत आपल्या हे माहीत नाही की प्लुटो कसा दिसतो, अतिशय इंटरेस्टिंग असलेला विषय अखेरीस माझ्या नजरेत आला व माझे संशोधन सुरु झाले " पासपोर्ट टू प्लुटो ! "
                            

वास्तविक नेपच्युन पलीकडे एखादा विशाल ग्रह असावा अशी भाकिते अनेक वर्षापासून करण्यात येत होती , त्यातच काही हौशी मंडळी या नवीन ग्रहाच्या शोधासाठी जोमाने लागली. १९०६ मध्ये पर्सिव्हाल लॉवेल या व्यक्तीने अ‍ॅरिझोना येथे लॉवेल वेधशाळा स्थापन केली व येथे या नवीन ग्रहाच्या शोधासाठी , किंबहुना त्याचे पहिले छायाचित्र हस्तगत करण्यासाठी प्रकल्प सुरु केला. परंतु १९१६ नंतर जवळपास १० वर्षे हा प्रकल्प असाच थांबला. १९२९ मध्ये वेधशाळेचे त्यावेळेचे संचालक व्हेस्टो मेलव्हिन स्लिफर यांनी या नवीन ग्रहाला शोधण्याची जबाबदारी  क्लाईड टॉमबॉघकडे सुपूर्द केली. टॉमबॉघचे यांचे काम होते, दोन आठवड्यांच्या अंतराने काढल्या गेलेल्या दोन छायाचित्रांचे निरीक्षण करणे व त्यामध्ये कोणत्या वस्तूने जागा बदलली आहे का ते पाहणे.
                                     
क्लाईड टॉमबॉघ "ब्लिंक सेपरेटर" नावाचे यंत्र वापरून नवीन ग्रहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते , ब्लिंक सेपरेटर हे यंत्र  आकाशातील एका ठराविक पट्याचा फोटो काढून त्याच पट्याचा  काही कालावधी नंतर फोटो काढून नंतर ते मागेपुढे हलवून ( काही जागा बदल्या आहे का ) हे तपासण्यास सक्षम होते.या छायाचित्रात  अतिदूर असलेले तारे आपली जागा बदलत नसत, परंतु एखादी गोष्ट जर आपल्या सूर्यमालेत असेल तर ती यात जागा बदलत असे. अश्याप्रकारे जवळपास एका वर्षाच्या अथक शोधानंतर फेब्रुवारी १८, १९३० रोजी टॉमबॉघला जानेवारी २३ व जानेवारी २९ च्या चित्रांमध्ये संभाव्य हाललेली वस्तू सापडली. व प्लुटो ग्रहाचा शोध लागला ! वास्तविक प्लुटो अतिदूर असल्याने वरील छायाचित्रात तो केवळ एका "बिंदू" सारखाच दिसतो!नवीन ग्रहाचा शोध लागल्या नंतर सर्वत्र एकाच खळबळ माजली, अनेक वृत्तपत्रांनी तर याला "शतकातील सर्वोत्तम वैज्ञानिक  शोध" असे वर्णन केले. प्लूटो हे नाव प्रथम "व्हेनेशिया बर्ने " या त्यावेळी ११ वर्षाच्या ऑक्सफर्ड येथील शाळकरी मुलीने सुचविले.
                                

प्लुटो हा ग्रह आधी पृथ्वीपेक्षा मोठा आहे असे मानण्यात येत होते, परंतु काही कालावधीनंतर तो आपल्या पृथ्वी एवढाच आहे असे मानण्यात आले , परंतु जशी जशी निरीक्षणे अचूक होत गेली तेव्हा आपल्याला त्याच्या अस्सल आकारमानाचा पत्ता  लागला , तेव्हा समजले कि तो आपल्या चंद्रापेक्षा देखील छोटा आहे. काही कालावधीसाठी असा विनोद बनलेला की प्लुटो जर असेच छोटा होत गेला तर तो २१ व्या शतकापर्यंत गायब होणार ! परंतु आता  २ गोष्टी या निश्चित होत्या की प्लुटो हा आकाराने खूप लहान आहे व तो पृथ्वीपासून अतिदूर आहे. प्लुटो हा "सुर्य-पृथ्वी" अंतराच्या ३० पट लांब आहे म्हणजे आपल्याला त्याच्या अंतराची  कल्पना आली असेल ( पृथ्वी पासून ७.५ बिलियन किलोमीटर/ ४.६७  बिलियन मैल ).  पृथ्वीपासून इतक्या लांब असल्याने आजपर्यंत आपल्याला तो कसा दिसतो हे माहित नाही , इंटरनेट वर प्लुटो चे अनेक फोटो उपलब्ध आहेत पण ते खोटे आहेत. आपण अजून पर्यंत फक्त कल्पनाच करू शकतो की प्लुटो ग्रह कसा असेल, पण याचा अर्थ असा नाही की मानवाने प्लुटो चा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला नाही!
                                

७० च्या दशकात क्लाईड टॉमबॉघ यांची वापरलेली पद्धत कायम ठेवत खगोल अभ्यासक जेम्स ख्रिस्ती व बॉब यांनी महिन्याभराच्या अंतराने प्लुटो चे २ छायाचित्र घेतले  या छायाचित्रात प्लुटो चा उपग्रह पहिल्यांदा दिसून आला , क्लाईड टॉमबॉघ यांनी प्लुटो च्या घेतलेल्या एका बिंदू च्या फोटो नंतर हा दुसराच प्रयत्न होता. त्या नंतर पृथ्वीवरील वेधशाळेतून  जमिनीवरून प्लुटो चे त्यावेळेचे सर्वात उत्तम छायाचित्र घेतले गेले, परंतु ते देखील स्पष्ट नव्हते तरीपण या छायाचित्रात प्लुटो व त्याचा उपग्रह शरोन स्पष्ट दिसत होता.
                                

 काही कालावधी नंतर हबल या अंतराळ दुर्बिणीची स्थापना नासा ने केली, पृथ्वी भोवती प्रदक्षिणा घालत ही  दुर्बीण अंतराळाचे फोटो घेत असत, त्यामुळे या सुवर्ण संधीचा खगोलशास्त्राज्ञानी लाभ उचलला, व हबल चा रोख प्लुटो कडे केला, तिने आपल्याला प्लुटो व त्याच्या उपग्रहाचे आजपर्यंत चे उत्तम छायाचित्र दिले तसेच त्यांच्या दोघांचे अंतर मोजण्यास देखील मदत झाली, परंतु प्लुटो हा पृथ्वी पासून अतिदूर असल्याने व आकाराने खूप लहान असल्याने आपण ८० च्या दशकापर्यंत देखील त्याचे खरे स्वरूप पाहू शकत नव्हतो

                                     
                                       

 अखेर ९० च्या दशकात हबल दुर्बिणी मधील आरसे दुरुस्त केल्यावर हबलने आपल्याला १ black&white फोटो दिला जो आजपर्यंत चा सर्वात उत्तम व हबल ने एवढ्या जवळून काढलेला अखेरचा फोटो ठरला, परंतु हा फोटो अतिशय धुसर  होता ,या black&white फोटोला true color मध्ये रुपांतर करायला नासाच्या खगोल अभ्यासकांना १ दशकापेक्षा जास्त वेळ लागला व आपल्याला कॉम्पुटर ने बनवलेले प्लुटो चे अंतिम छायाचित्र मिळाले. प्लुटो हुबेहूब असा दिसत नाही परंतु त्याचा भूभाग असा असावा असे आपण गृहीत धरू शकतो! खरेच १९३० मध्ये एका छोट्याश्या बिंदू पासून सुरवात झालेला  प्लुटो चा प्रवास आपण त्याच्या truecolour फोटो पर्यंत येउन पोहोचवला.

                               
                                    

                           

प्लुटो सूर्याभोवती २४८ वर्षात एक फेरी पूर्ण करतो म्हणजे त्याचा एक ध्रुव हा १२० वर्ष कायम अंधारात असतो वर एक ध्रुव १२० वर्ष कायम उजेडात असतो. याच कालावधीत प्लुटो च्या आसपास ( मागे- पुढे) लघुग्रहांच्या पट्ट्या सारख्या अनेक छोट्या बर्फाळ वस्तू सापडू लागल्या. यांची केवळ कक्षाच नव्हे तर आकार व संरचना पण प्लूटोसारखी होती. या पट्ट्याला "जेरार्ड कायपर " यांच्या नावावरून कायपरचा पट्टा असे नाव देण्यात आले.
                              
  २००६ पर्यंत प्लुटो ला ग्रहाच मानण्यात आलेले. परंतु याच सुमारास मायकल ब्राउन यांना प्लुटोपेक्षा २५% मोठा असलेला अजून एक ग्रह सापडला ज्याला एरिस असे नाव दिले गेले. परंतु एरिस च्या शोध नंतर मात्र प्लुटो पुढील "ग्रह" हे विशेषण जाणार होते ! वास्तविक प्लुटो ची कक्षा इतर ग्रहांच्या तुलनेत जर अजब आहे. प्लूटोची कक्षा लंबवर्तुळाकार असून ती या प्रमाण प्रतलापासून १७° पेक्षा जास्त कललेली आहे. त्याचप्रमणे प्लुटो हा नेपच्यून च्या कक्षेला छेदत जातो. एरिस ची कशा देखील अशीच थोडी विचित्र आहे. अखेर २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे.
१. ती खगोलीय वस्तू सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असावी.
२. त्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान कमीत कमी इतके असावे की ज्यायोगे तिचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार व्हावा.
३. त्या खगोलीय वस्तूने आपली कक्षेजवळील भाग साफ केलेला असावा. याचा अर्थ असा की तिच्या कक्षेजवळील अंतराळातील लहान वस्तू तिच्या गुरुत्वाकर्षणाने तिच्यामध्ये विलीन झाल्या असाव्यात.
वर सांगितल्याप्रमाणे प्लुटो हा नेपच्युन च्या कक्षेला छेदत जात असल्याने प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही, त्यामुळे त्याला आज ग्रह मानण्यात येत नाही व तो आज बटू ग्रहांच्या यादीत आहे.


प्लुटो हा पृथ्वी पासून जेव्हा जवळ असतो तेव्हा खूप जवळ असतो व जेव्हा लांब असतो तेव्हा प्रचंड लांब, प्लुटो ने सध्या नुकतीच नेपच्यून ची कक्षा ओलांडली  आहे त्यामुळे तो आता सूर्यापासून अतिदूर जाणार, म्हणजे आपण जर प्लुटो वर यान पाठवायचा प्रयत्न उशिरा केला तर आपल्याला अजून २४८ वर्षे थांबावे लागेल म्हणून नासा ने "न्यू होरायझन्स"  या यानाला प्लुटो वर पाठवायचा निर्णय घेतला आहे, वास्तविक १९९० च्या  दशकात " कायपर एक्सप्रेस  " हे यान प्लुटो कडे पाठवायचे ठरवले होते परंतु अमेरिका सरकारने या यानाला निधी मंजूर केला नाही व हा प्रकल्प रखडला , त्याच्या आधी  म्हणजे १९७० च्या दशकात वोयेजेर -१ हे यान प्लुटो जवळून जाणार होते परंतु अचानक त्याची कक्षा बदलून ते शनि ग्रहाचा उपग्रह  टायटन कडे वळवण्यात आले , सोबतची वोयेजेर - २ तसेच पायोनियर - १० इत्यादी याने प्लुटो पासून प्रचंड लांब होती त्यामुळे १९३० मध्ये शोध लागून सुद्धा आपण एकपण यान प्लुटो जवळ  किवा खास प्लुटो चा अभ्यास करण्यासाठी पाठवले नाही त्यामुळे आज २०१५ ला सुद्धा प्लुटो ग्रह एक कोडेच बनला आहे! २००६ साली न्यू होरायझन्स हे यान प्लुटो कडे झेपावले. न्यू होरायझन्स हे आजपर्यंत चे सर्वात जलद असे यान आहे , त्याने  चंद्राची कक्षा  केवळ ९ तासात ओलांडली ( ज्या साठी अपोलो ला ३ दिवस लागलेले ) एवढे जलद यान असून सुद्धा ते २०१५ ला प्लुटो जवळ पोचेल ( म्हणजे अजून ३ महिन्यांनी ) ते इतक्या वेगाने धावत आहे की हलक्याश्या दगडाने देखील यान नष्ट होऊ शकते. त्याचप्रमाणे त्याचे आवरण खास करून तयार केले आहे , या आवरणाच्या आत सर्व यंत्रे/ कॅमेरा ठेवला आहे. आवरणा बाहेरील तापमान  -२०० फ़ेरेनहाईट पर्यंत  जाऊ शकते परंतु आवरणा आतील वस्तूंचे तापमान मात्र २२ सेलसीअस आहे ( म्हणजे रूम टेम्परेचर)     न्यू होरायझन्स यान पाठवण्यापूर्वी खगोल अभ्यासकांनी पुन्हा एकदा हबल ची मदत घेतली व या वेळी प्लुटो चे १ नवीन रूप समोर आले!! आजपर्यंत आपल्याला माहित होते की प्लुटो ला १ उपग्रह आहे , परंतु आता ४ अजून नवीन उपग्रहांचा शोध लागलेला. प्लुटो जवळ जाणारे पहिलेच यान असल्याने या यांना पासून अपेक्षा खूप आहेत याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात "क्लाईड टॉमबॉघ" यांच्या अस्थि देखील जोडल्या आहेत म्हणजे क्लाईड टॉमबॉघ यांना त्यांचा लाडका ग्रह पहावयास मिळावा म्हणून! प्लुटो पर्यंत चा प्रवास अतिशय खडतर आहे, आपल्याला प्लुटो ची पहिली अस्सल झाला १४ जुलै २०१५ ला पहावयास मिळेल , यान १४ जुलै ला प्लुटो चे छायाचित्र काढेल व पृथ्वीकडे पाठवेल . मगाशी सांगितल्या प्रमाणे प्लुटो पृथ्वीपासून अतिदूर असल्याने यांचे संदेश पृथ्वीवर पोचायला ४.५ तासांचा  अवधी लागेल , डाऊनलोड  स्पीड रेट असेल २ केबी प्रती सेकंद ( 2kb/ps). १५ जुलै ला सकाळपासून डाऊनलोडिंग    चालू होईल व आपल्याला प्लुटो चा पहिला वाहिला फोटो पहावयास मिळेल जो कायम सर्वांच्या स्मरणात राहील ! म्हणून आता १४ जुलै २०१५ चा इंतजार... !!!
                         

2 comments:

rrahulmorye said...

Very interesting ninad...!! Keep writing...!!

निनाद गायकवाड said...

thank you rahul :)