Tuesday, June 19, 2012

नेताजींचे गूढ !


(प्रस्तुत लेखात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या गूढ मृत्यू विषयची माहिती अनेक इंटरनेट साईट्स चा आधार घेऊन खास करून मराठी मध्ये आपल्या पर्यंत पोहोचवण्यात आली आहे! )


"नेताजी!"

पुन्हा एकदा या विषयाबद्दल लिहायला खूप बरे वाटत आहे ! प्रत्येक भारतीयाच्या मनात नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या बद्दल १ आदराचे स्थान आहे! खरचं तर त्यांच्या विषयी लिहिण्या सारखे खूप आहे! परंतु सर्वात मोठे दुर्दैव मला असे आढळून आले की जर आपण इंटरनेट वर मराठी भाषेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी काही शोधायला गेलात तर आपल्याला प्रचंड मेहनत करून सुद्धा जास्त काही हाती लागणार नाही! कारण मी सुद्धा तसा प्रयत्न करून बघितला आहे! सध्याच्या आकडेमोडीच्या अनुसार नेताजींच्या "गूढ मृत्यू" विषयी आज प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्सुकता आहे आणि त्यामुळेच सहजच तो इंटरनेट च्या मध्यम कडे वळतो! आणि बहुतांश माहिती हि इंग्रजी भाषेत उपलब्ध असल्याने तो शोध करायचा थांबून जातो! आपण स्वत एकदा प्रयत्न करून पहा ! म्हणूनच मी असा निश्चय केला की नेताजींच्या मृत्यू विषयी ची जास्तीत जास्त माहिती मी आपल्याला " मराठी भाषेतून " उपलब्ध करीन ! आणि त्याचाच हा १ छोटासा प्रयत्न आहे!



"भारतरत्न" !

या लेखाची सुरवात करण्यापूर्वीच इंटरनेट च्या माध्यमातून मला अशी माहिती मिळाली की १९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला ‘भारतरत्न’ पुरस्कार परत घेण्यात आला. इतिहासातली ही दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची एकमेव घटना आहे. खरेच मला हेय पाहून फार वाईट वाटले! एकाद्या देशभक्ताला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळू नाही शकत!



"भारत शेवट पर्यंत टिकला" !
१९४५ साली जपान ने शरणागती पत्करल्या नंतर सगळ्या जगात फक्त भारत आणि त्याची " आझाद हिंद फौज होती जिने अमेरिका इंग्लंड च्या तकदी समोर शरणागती पत्करली नव्हती ! यातूनच सुभाषबाबुंचे देश साठीशेवटपर्यंत लढण्याची जिद्द आपल्याला दिसून येते! महायुद्धात आपणच सगळ्यात शेवट पर्यंत महा सत्तेचा मुकाबला करत होतो!
 "काय झाले होते १८ ऑगस्ट १९४५ ला ?"


सर्वात आधी नेताजी हे आपल्या कर्नल हबीबुर्रहमान, कर्नल प्रीतम सिंह, एस.ए. अय्यर तसेच जपानी दुभाषी निगेशी नावाचा व्यक्ती एवढे सगळे जण एका विमानातून बँगकॉक साठी रवाना होतात ! आणि  त्यांच्या मंत्री मंडळाचे अन्य सदस्य कर्नल गुलजारा सिंह, मेजर आबिद हसन, श्री देबनाथ दास हे दुसऱ्या विमानातून त्यांच्या सोबत येत असतात ! आता बँगकॉक मध्ये नेताजी हे आपल्या काही महत्व पूर्वक गोष्ठी करतात तसेच तेथील भारतीयांच्या भेटीगाठी करतात आणि ठीक ५ वाजता झोपतात !
                                     
१७ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी पुन्हा विमानात बसून सकाळी ८ वाजल्यापासून सुरु झालेल्या प्रवास नंतर सकाळी ११ वाजता ३ तासाच्या प्रवास नंतर "सायगाव" येथे पोचतात ! सायगाव ( मराठीत याला सायगाव असे म्हणतात) या शहराला अनेक नावानी  ओळखले जाते! हिंदीत या शहराला "सायगन" असे म्हणतात तर सध्याचे याचे नाव "हो-चि-मिन्ह" असे आहे! अधिक माहिती साठी गुगल MAPS च्या आधारे पहा हे शहर कोठे आहे ते फक्त येथे क्लिक करा !

                                


सायगाव  येथे पोचून ते भारतीय अधिकार्याच्या घरी विश्राम करावयास जातात , एका  तासाच्या विश्रांती नंतर त्यांना भेटायला जपानचा संपर्क अधिकारी "कियोनो" हा येतो व  तो त्यांना सांगतो कि "फक्त नेताजींना" नेण्या साठी १ विमान हवाई तळावर उभे आहे! तसेच कियोनो नेताजींना असेही सांगतो कि विमान कोहे जात आहे ते आम्ही आपल्याला सांगू शकत नाही कृपया आपण चालावे कारण हे स्थिती फार गंभीर आहे! हेय कियोनो  चे बोल ऐकून सुद्धा नेताजी कोणत्याही "अज्ञात" स्थळी जाण्यास नकार देतात! हेय ऐकून कियोनो चा नाईलाज होतो व तो आपल्या वारीस्था अधिकार्यांना म्हणजे जनरल ईशोदा, श्री हाचैया आणि फील्ड मार्शल तेराउचि यांच्या अधिकार्याला घेऊन येतो! यांच्या सोबत नेताजींची तातडीची बैठक एका बंद खोलीत होते! खोलीत असे ठरते कि नेताजींनी त्वरित "मंचुरीयाला" रवाना व्हावे! मगाशी उल्लेख केल्या प्रमाणे नेताजींचे सहयोगी  एस.ए. अय्यर यांनी देखील आपल्या पुस्तकात असा उल्लेख केला आहे , माझ्या कडे सुद्धा ते पुस्तक आहे (मराठी अनुवाद- कथा आझाद हिंद सेनेची)  , या गुप्त बैठकी मध्ये जपानी सैनिक अधिकारी फक्त नेताजीनाच विमानात जाण्यास सांगतात परंतु नेताजींच्या विनंती नुसार आता कर्नल हबिबूर रेहमान सुद्धा आता नेताजींच्या सोबत "त्या" प्रवासाला जायला निघतात ! एवढे होते न होते तोवर नेताजी आणि हबीब गाडीमध्ये बसून विमानतळाकडे कूच करतात !


"त्या" प्रवासाला सुरवात !

सध्याच्या उपलब्ध माहिती च्या आधारे त्या विमानात एकूण १३ लोक होते त्या पैकी दोघांची योग्य नावे मला सापडली नाहीत! त्या प्रवासात विमानात बसलेल्या त्या व्यक्ती पुढीलप्रमाणे , 
१. मेजर ताकिजावा, 3र्ड एयर फोर्स, पायलट
२. वोरान्त ऑफिसर आयोगी, असिस्टेण्ट पायलट
३. सार्जेण्ट ओकिता, नेवीगेटर
४(नॉन कमीशंड ऑफिसर) तोमिनागा, रेडियो ऑपरेटर
५. अजून १ एक एन.सी.ओ
६. लेफ्टिनेण्ट जेनरल सिदेयी, चीफ ऑव स्टाफ, बर्मीज आर्मी कमाण्ड
७ .लेफ्टिनेण्ट कर्नल साकाई, स्टाफ ऑफिसर
८ .लेफ्टिनेण्ट कर्नल शिरो नोनोगाकी, स्टाफ ऑफिसर, जापान एयर फोर्स
९. मेजर तारो कोनो, स्टाफ ऑफिसर, जापान एयर फोर्स
१०. मेजर ईवाओ ताकाहाशी, स्टाफ ऑफिसर
११.कैप्टन केयिकिची अराई, एयर फोर्स इंजीनियर
१२. नेताजी सुभाषचंद्र बोस अझाद हिंद फौज प्रमुख
१३.  कर्नल हबिबुर्रहमान खान, आझाद हिंद फौज

हे विमान आता १३ जणांना घेऊन निघते वर ७:३० च्या सुमारास "तुरेन" येथे पोहोचते. रात्री सार्वजन हॉटेल मध्ये आराम करतात तसेच सायगाव येथून निघण्यापूर्वी विमानात खूप समान ठेवलेले असते आता हे समान या ठिकाणी काढून विमान "हलके" करण्यात येते! येथून विमान तैपई येथे जाते व तीठेय विमानात इंधन भरण्यात येथे! याच सुमारास विमानात बसलेल्या त्या प्रवास्यांना "नष्ट " उपलब्ध करून दिला जातो! विमानात इंधन भरून झाल्यावर आता ते उडण्या साठी सज्ज असते आणि त्या विमानाची आणि सुभाष बाबूंची यात्रा सुरु होते! यानंतर २ तथ्य जागा समोर  आले कि नेताजींचा या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला किवा ते सुखरूप मांचुरिया ला व तेथून रशियाला पोहोचले! आपण आता दोन्ही संभावना तपासून पाहणार आहोत!


"त्या अपघातानंतर" 

यानंतर मी अनेक ठिकाणी पाहणी केल्यावर मला आढळून आले कि सायगाव वरून नेताजी जेव्हा निघाले तेव्हापासून ते निघाल्याच्या वेळेच्या योग्य नोंदी करून ठेवलेल्या नाहीत! अनेक लोक अनेक पुरावे सदर करतात! आता नेताजींची विमान यात्रा सुरु झाली आहे धावपट्टीवरून विमान उडल्यावर विमानात स्फोट होतो आणि विमान जमिनीवर आपटते हा अपघात विमानतळा जवळच होतो , विमानतळा पासून जवळच असलेल्या इस्पितळात ज्याचे नाव "नानमोन" सैन्य रुग्णालय आहे तेथे नेताजींना तसेच त्या विमान अपघातात जखमी झालेल्या लोकांना पाठवण्यात येते! मी एके ठिकाणी वाचले आहे कि नेताजी विमानात ज्या ठिकाणी बसले होते त्याच्या मागेच इंधनाची टाकी होती त्यामुळे अपघात झाल्यावर ते इंधन नेताजींच्या अंगावर पडले व ते जास्त जखमी झाले असे हबिबूर रेहमान यांनी नोंदवून ठेवले आहे , त्यांना रुग्णालयात "डॉ. टी सुरुता" यांच्या मार्गदर्शना खाली औषधोपचार केला जात आहे तसेच येथील एक  "नर्स डॉ. योशिनि" सुभाषबाबूंवर "ट्रेसिंग" करत आहे! सुरवातील इस्पितळातील कर्मचार्यांना सांगितले जाते कि हे "कट काना" ( जपान मधील सुभाष बाबूंचे नाव) आहेत यांना वाचवायचा पूर्ण प्रयत्न करावा अश्या प्रकारे औषधोपचारा नंतर सुभाषबाबूंना जरा बरे वाटते तसेच त्यांना एका जपानी अधिकार्याचे रक्त देखील चढवण्यात येते  त्यांना व हबिबूर रेहमान या दोघांना एकत्र त्या रुग्णालयाच्या दोन नंबर च्या वॉरड मध्ये ठेवण्यात येते!  याच दरम्यान नेताजींना सुद्धा येते व ते सतत पाणी मागतात तसेच त्यांना इस्पितळातील जपानी कर्मचार्यान सोबत बोल्याण्या साठी १ दुभाष्याची सुद्धा व्यवस्था केली गेली होती त्याचे नाव होते "नाकामुरा" ! परंतु एवढे सगळे करून सुद्धा नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू होतो! या बाबतीत  डॉ. योशिनी यांनी नेताजींच्या मृत्यू ची वेळ हि रात्रो ११ वाजता अशी नोंद केली आहे! 

"विमानातील बाकीच्या लोकांचे काय झाले ? "


मागे मी विमानातील १३ लोकांचा उल्लेख केला होता जे त्या विमानात प्रवासी म्हणून होते त्या पैकी  लेफ्टिनेण्ट जेनरल सिदेयी आणि पायलट मेजर ताकिजावा यांना घात्नास्थालीच मृत्यू येतो तसेच वारण्ट ऑफिसर आयोगी आणि ते दोघे ज्यांचे नाव मला सापडले नाही या तिघांचाही पुढे उपचार दरम्यान इस्पितळात मृत्यू होतो  म्हणजेच नेताजींच्या शिवाय आणखीन ५ लोक या अपघातात मृत्यू मुखी पडतात व ७ लोक जिवंत राहतात , हबिबूर रेहमान यांच्या अनुसार नेताजींच्या पैण्ट मध्ये आग लागली होती व ती सर्व शरीरभर पसरत गेली, हबिबूर यांनी स्वतःच्या हाताने ती विझवली ज्यात त्यांचे हात पण भाजले. तसेच बाकीच्या लोकांना सामान्य जखमा ( ?) होतात ! 


                                

नेताजींचे "मृत्यू प्रमाण पत्र"  

नंतर जपान सरकार नेताजींचा मृत्यू गुप्तः ठेवण्याची तसेच त्याचं संदर्भातला कोणताही प्रकारचा माहिती अहवाल कोठेही प्रसिद्ध करत नाही अत्यंत गुप्तता बाळगली जाते ! नंतर सुभाषबाबूंचा अंतिम संस्कार करण्या साठी त्यांना तऐपोई नगरपालिकेत "मृत्यू च्या " प्रमाणपत्र साठी आणले जाते तेव्हा त्यांच्या सोबत हबिबूर रेहमान सुद्धा असतात! मी हे आपल्या ब्लॉग च्या वाचकांसाठी पुढे जोडलेले आहे  
१. आश्चर्य म्हणजे या मृत्यू पत्रात सुभाष बाबूंच्या निधनाचा उल्लेख हा दुपारी ४ ला केला आहे तर आधी सांगितल्या प्रमाणे   डॉ. योशिनी यांनी तो रात्रो ११ असा केला होता 
२. येथे सुभाष बाबूंचे नाव इचिरो ओकुरा असे आहे ! वास्तविक नगरपालिकेतील अधिकार्यांना हेच "काटा काना" ( म्हणजे जपानी मध्ये सुभाषचंद्र बोस) हे माहित नव्हते त्यामुळेच अंतिम संस्काराचं वेळेस सुद्धा कोणीही हेय जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही 
३. सुभाष बाबूंना "सैनिक, टेम्पोररी, ताईवान गवर्नमेण्ट मिलिटरी " या ओळखीच्या आधारे मृत्यू पत्र दिले गेले होते म्हणजेच १ साधारण जपानी सैनिक 
४. मृत्यू चे कारण हे आजारपण आहे असा उल्लेख आपणास येथे पहावयास मिळतो 


आता मृत्युपत्र मिळाल्यावर २ जपानी अधिकारी त्याची ओळख त्याचप्रमाणे इतर गोष्टींची पडताळणी करण्या साठी २ जपानी अधिकार्यांना पाठवतात तेठेय त्यांना खरे सांगण्यात येते कि हा जपानी सैनिक इचिरो ओकुरा नसून " काटा काना" ( म्हणजेच जपानीत सुभाष चंद्र बोस) आहेत तसेच गुप्तता म्हणून त्यांच्या मृत्यू ची कोणतीही बातमी आम्ही उघडपणे जाहीर करत नाही आहोत ! अश्या प्रकारे अधिकाऱ्यांचे असे बोलणे ऐकून जपानी अधिकारी सुद्धा "अधिक" भानगडीत पडत नाही तसेच ते अंतिम संस्कारासाठी पुढे पाठवले जातात ! अश्या प्रकारे नेताजींचे अंतिम संस्कार होऊन त्यांच्या अस्थी जपानच्या " रेन्कोजी मंदिरात " ठेवल्या जातात ! आजतागायत त्या तेथेच ठेवल्या गेल्या आहेत ! रेन्कोजी मंदिराच्या बाबतीत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा ! तसेच रेनकोजी मंदिर कसे आहे तसेच त्याचा आजुपाजूचा परिसर कसा आहे इत्यादी जाणून घेण्यासाठी या वीडीओ वर क्लिक करा !
पुढील लेखात आपण नेताजींच्या बाबतीतल्या अनेक गोष्टींबद्दल पाहू ! 




5 comments:

शांतीसुधा (Shantisudha) said...

धन्यवाद. छान माहीती.

निनाद गायकवाड said...

मी हा लहानसा प्रयत्न केला नेताजीन बद्दल शक्य तितकी "गूढ" माहिती आपल्या मराठी भाषिकांपर्यंत मराठी मध्ये पोहचवण्याचा! ब्लोग ला भेट दिल्या बद्दल आपला आभारी आहे

Yogesh said...

Nice one...

निनाद गायकवाड said...

धन्यवाद योगेश :)

अमेय पत्की said...

आपण संकलित केलेली माहिती चांगली आहे. नेताजींबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नसणे हे आपले दुर्दैव आहे.
काही लहान चुका आहेत- "काटा काना"(म्हणजेच जपानीत सुभाष चंद्र बोस)
हे पूर्णतः चूक आहे. काताकाना हे जपानी भाषेतील लिपीचे नाव आहे. त्याचा अर्थ सुभाष चंद्र बोस असा मुळीच होत नाही. मी स्वतः जपानी भाषेचा शिक्षक असून गेली ५ वर्षे जपानी भाषा शिकवित आहे. जपानच्या रेंकोजी मंदिरात जाऊन नेताजींच्या अस्थींचे दर्शन घेण्याचे भाग्यही मला लाभले आहे. त्या अस्थी नेताजींच्याच आहेत, असा दावा मी कोणत्याही ऐतिहासिक पुराव्यानिशी करू शकत नाही. परंतु गेली ६९ वर्षे त्या अस्थींची काळजी घेत, नित्यनेमाने व श्रद्धेने त्यांची पूजा करीत नेताजींच्या स्मृती जपण्याचे कार्य करणार्‍या जपानी पुजार्‍यांच्या डोळ्यांत पाहून आणि त्यांच्याशी बोलून त्या नेताजींच्याच अस्थी आहेत यावर माझा ठाम विश्वास बसलेला आहे.