Sunday, June 20, 2010

पणजी टू कारवार व्हाया नॅशनल हायवे १७ !

( मी अणि जसजीत)

पणजी टू कारवार व्हाया नॅशनल हायवे १७ !

गेल्याच महिन्यात कॉलेज च्या मित्रांबरोबर गोवा च्या सहलीला गेलो होतो ! त्यासाठी आम्ही "Fzee bike" अणि "Activa" घेतली होती ! सहल उत्तम झाली .. ! त्यातील सर्वात अविस्मरनीय आठवण सांगू इच्छितो ! आम्ही "कोल्वा " बीच ला जाण्याचे ठरवले जे कारवार ( कर्नाटक) पासून अगदी जवळ म्हणजे २० किमी वर आहे ! गोवा चे शेवट म्हणजे जवळ जवळ हे बीच ! तर आता आम्ही आमच्या "activa " ने तीथे जाणार होतो ! जवळ पास सगले सामान घेतले.. पेट्रोल फुल भरले अणि निघालो "कोल्वा बीच " कड़े ..

( आमचा कॉलेज च्या मित्रांचा ग्रुप )

आम्ही असा रास्ता ठरवला होता बागा - कलंगुटे-पणजी- अणि इथूनपुढे ओल्ड गोवा करून पुढे कोल्वा.. अणि वेळ मिलला तर कारवार ! असे करत आमची "Activa" निघाली ! "Activa " माझा मित्र "जसजीत " चालवत होता ! वास्तविक आम्ही असे ठरवले होते की गाड़ी चालवून जर का तो थकला तर मी चलावणार अणि मी थकलो तर तो चलावणार .. पणजी सोडून ( कारन माझ्या कड़े गाड़ी चालवायचा परवाना नाही .. अणि पणजी मध्ये पोलिस असतात .. जसजीत कड़े परवाना आहे खास गोवा ला फिरन्या साठी त्याने तो काढला ! ) असे करत अगदी आम्ही पणजी ओलांडून ओल्ड गोवा ला आलो !

( आम्ही ओल्ड गोवा ला असताना )

आम्ही ओल्ड गोवा बघितला .. आता दुपार झाली होती.. उन कडाक्याचे होते .. जसजीत ने "Activa" काढली ! आता आम्ही "कोल्वा " बीच ला जात होतो .. आम्हाला आता नॅशनल हायवे १७ लागला होता .. ! तीथे बीच बद्दल विचारना केलि तर कलले की आता आम्हाला आधी फोंडा ला जावे लागणार अणि नंतर कोल्वा बीच ला ! असे करत करत चुकून "Longcurt" घेउन आम्ही फोंडा पर्यंत पोहोचलो कसे बसे.. परन्तु आता मात्र सकाळ पासून "Activa" चालवत असलेला जसजीत पार थकला.. पणजी च्या बाहेर आल्याने आता गाड़ी चा ताबा मी घेतला ! अणि सुसाट वेगाने महा मार्गावर गाड़ी काढली ! परन्तु मला माहित नव्हते की माझ्या वाट्याला आलेल्या १५-१६ किमी चे अंतरात भरपूर ट्राफिक येणार आहे ! आता बीच जवळ जवळ येऊ लागले होते .. आम्ही १०० किमी चा प्रवास तर नक्कीच केला होता .. ! महामार्गा वर दुर्दैवाने ट्राफिक होती .त्यामुले मना सारखी गाड़ी पलवता आली नाही ! ८ वाजता बीच जवळ पोहोचलो !
( कोल्वा बीच वर रात्री ८:३० ला मी ! )

रात्र झाली .. आता काय करणार म्हणून हताश बसण्या पेक्षा .. आम्ही रात्रि ८:३० च्या सुमारास पाण्यात उड्या मारल्या .. अणि अगदी १ तास मनसोक्त बीच वर पोहत बसलो ! आमचे हे अजब -गजब धैय्र पाहून बाकीची मंडली सुद्धा आली ! अणि अगदी मनसोक्त पोहून झाल्यानंतर भूक लगली नशिबाने समजले कि इथून ५-१० मिनिटाच्या अंतरावर "Dominose Pizza" आहे .. ! मग तिथेच रात्रीचे जेवण केले .. ! अणि आता आमच्या पुढे एकाच लक्ष होते " कारवार" कारण आता परत काही आम्ही एवढ्या लांब येणार नव्हतो ! काढल्या गड्या परत सुसाट .. ! अणि पोहोचलो थोड्याच वेळात !

आता सुरु झाला सर्वात कठिन अणि सर्वात अविस्मरनीय परतीचा प्रवास ! जसजीत च्या अंगात जणू भुतच चढले होते अन तो बोलला की आता मी चलावणार ! मी होंकार देऊन मागे आराम करण्याचे ठरवले ..! आता आम्ही महामार्गाच्या छोट्याश्या रस्त्यातून ८० च्या स्पीड ने जात होतो.. रत्यावर लाइट नव्हत्या .. की पुलिस नव्हते .. ! आम्हाला गरम होत होते . म्हणून आम्ही आमचे कपडे कडून फ़क्त "Half Pant" वर गाड़ी चालवत होतो.. रात्रीच्या अंधारात सुसाट वेगाने जात असताना वार्याची मंद झुलुक अंगाला स्पर्श करून जात असे.. अणि डोळे बंद केले की आपण कोणा वेगळ्या जगात तर नाही ना असेच वाटायचे.. ! आता आम्ही सगले ८ ही जन रांगेत जात होतो.. सुसाट .. वेगात .. अणि बघता बघता अर्ध्या तासात पणजी आले सुद्धा ! आम्हाला सकाळी यासाठी जवळ जवळ १ तस १५ मिनिटे लागला होता .. तेच अंतर आम्ही आता अर्ध्या तासात गाठले.. ! अणि पणजी शहराच्या ब्रिज वर आराम करण्या साठी थाम्ब्लो.. तेव्हा देखिल "विदाउट शर्ट" होतो !

( पणजी ब्रिज वर घेतलेला होल्ट )

आता पर्यंत चा अविस्मरनीय प्रवास केला होता .. .! आता १५ किमी बाकि होते बाघा बीच म्हणजेच आमचे होटल पणजी पासून ! आता जवळ जवळ सगलेच थकले होते .. फटाफट गाड़ी चालू करून आता आम्ही आमच्या होटल ला जायची तयारी करत होतो..! तेव्हा वाटले की खरेच हे क्षण कधी न विसरानारे आहेत ! कॉलेज मध्ये असना कधी असा विचारही नाही केला होता की एखाद्या दिवशी मित्रां बरोबर गोवा ला जाईन.. अणि असा रात्रीचा "Adventures" प्रवास करीन.. विचार करत असताना होटल केव्हा आले ते कलले देखिल नाही !

No comments: